'लोकल'सेवा सुरळीत, रात्रभर अडकलेल्या प्रवाशांची सकाळी 'घरवापसी'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 06:10 AM2019-09-05T06:10:50+5:302019-09-05T06:12:49+5:30
मुंबई - बुधवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावासानंतर बंद पडलेली लोकलसेवा पुन्हा सुरू झाली आहे. बुधावारी दुपारपासून बंद असलेली मध्य ...
मुंबई - बुधवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावासानंतर बंद पडलेली लोकलसेवा पुन्हा सुरू झाली आहे. बुधावारी दुपारपासून बंद असलेली मध्य रेल्वेसेवा पहाटेपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रभर घराकडे डोळे लावून बसलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. सीएसएमटीकडून कर्जतकडे जाणारी मध्य रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. मध्यरात्री 3.17 मिनिटांनी सीएसएमटीकडून अंबरनाथच्या दिशेने पहिली लोकल रेल्वे पाठविण्यात आली होती.
#CR#HarbourLine#Updates
— Central Railway (@Central_Railway) September 5, 2019
Local train towards Andheri has left CSMT at 5.22 hrs.
Services towards Panvel from CSMT will resume soon.@RidlrMUM@m_indicator@mumbairailusers
महाराष्ट्राच्या अनेक भागांत पुढच्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, ठाणे, कोकणातील शाळा आणि ज्युनिअर कॉलेजना गुरुवारी, ५ सप्टेंबरला सुटी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी यासंबंधीचं ट्विट केलं आहे. आपापल्या भागातील पावसाचा अंदाज घेऊन, शाळांना सुटी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची लोकलसेवा सुरु करण्यात आली असून लवकरच हार्बर लाईनही सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
The first local from CSMT departed at 3.17 hrs for Ambernath. Water level is slowly receding on tracks. We will keep you updated.
— Central Railway (@Central_Railway) September 4, 2019
CR Suburban updates at 06.00 hrs
— Central Railway (@Central_Railway) September 5, 2019
Harbour line services restored.
Local train towards Andheri left CSMT at 5.22 hrs and local train towards Panvel left CSMT at 6.00 hrs.@RidlrMUM@m_indicator@mumbairailusers