Mumbai Local : आज मुंबईतील लोकल झाली ९७ वर्षांची, ४ डब्यांची लोकल १५ डब्यांची होण्यासाठी लागली ८७ वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 08:16 AM2022-02-03T08:16:44+5:302022-02-03T08:17:52+5:30

Mumbai Suburban Railway : इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयु) लोकल मध्य रेल्वेने ९७ वर्षे पूर्ण केली आहेत. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी ४ डबे असलेली पहिली (ईएमयु) सेवा तत्कालीन बॉम्बे व्हीटी (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) ते कुर्ला अशी हार्बरमार्गे सुरू करण्यात आली होती.

Mumbai Local: Today the local in Mumbai became 97 years old, it took 87 years for a 4-coach local to become a 15-coach local. | Mumbai Local : आज मुंबईतील लोकल झाली ९७ वर्षांची, ४ डब्यांची लोकल १५ डब्यांची होण्यासाठी लागली ८७ वर्षे

Mumbai Local : आज मुंबईतील लोकल झाली ९७ वर्षांची, ४ डब्यांची लोकल १५ डब्यांची होण्यासाठी लागली ८७ वर्षे

googlenewsNext

मुंबई :  इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयु) लोकल मध्य रेल्वेने ९७ वर्षे पूर्ण केली आहेत. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी ४ डबे असलेली पहिली (ईएमयु) सेवा तत्कालीन बॉम्बे व्हीटी (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) ते कुर्ला अशी हार्बरमार्गे सुरू करण्यात आली होती, ही भारतीय रेल्वेची पहिली  ईएमयु  सेवा होती. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना चार मार्गांवर  मुख्य, हार्बर व ट्रान्सहार्बर आणि चौथा कॉरिडॉर (नेरुळ/बेलापूर-खारकोपर) सेवा देत आहे.  

कोणता वर्षांत किती गाड्या
१९२५    १५० दैनिक सेवा
१९३५      ३३० दैनिक सेवा 
१९५१    ५१९ दैनिक सेवा 
१९६१    ५५३ दैनिक सेवा 
१९७१    ५८६ दैनिक सेवा 
१९८१    ७०३ दैनिक सेवा
१९९१    १०१५ दैनिक सेवा 
२०११    १५७३ दैनिक सेवा 
२०२०     १७७४ दैनिक सेवा 

ईएमयू प्रकार व सेवेचा वर्षवार इतिहास
१९२५      हार्बर मार्गावर ४-डबे 
१९६३     मुख्य आणि हार्बर मार्गावर ९-डबे 
१९८६     मुख्य मार्गावर १२-डबे
१९८७     कर्जतच्या दिशेने १२-डबे
२००८     १२-कार कसारा बाजूला
२०१०     ट्रान्सहार्बर लाईनवर १२-डबे 
२०११     सर्व मेनलाईन सेवा १२ -डबे 
२०१६     हार्बर मार्गावर सर्व १२-डबे 
२०२१     हार्बर मार्गावर वातानुकूलित गाडी 

Web Title: Mumbai Local: Today the local in Mumbai became 97 years old, it took 87 years for a 4-coach local to become a 15-coach local.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.