Join us

Mumbai Local : आज मुंबईतील लोकल झाली ९७ वर्षांची, ४ डब्यांची लोकल १५ डब्यांची होण्यासाठी लागली ८७ वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 8:16 AM

Mumbai Suburban Railway : इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयु) लोकल मध्य रेल्वेने ९७ वर्षे पूर्ण केली आहेत. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी ४ डबे असलेली पहिली (ईएमयु) सेवा तत्कालीन बॉम्बे व्हीटी (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) ते कुर्ला अशी हार्बरमार्गे सुरू करण्यात आली होती.

मुंबई :  इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयु) लोकल मध्य रेल्वेने ९७ वर्षे पूर्ण केली आहेत. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी ४ डबे असलेली पहिली (ईएमयु) सेवा तत्कालीन बॉम्बे व्हीटी (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) ते कुर्ला अशी हार्बरमार्गे सुरू करण्यात आली होती, ही भारतीय रेल्वेची पहिली  ईएमयु  सेवा होती. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना चार मार्गांवर  मुख्य, हार्बर व ट्रान्सहार्बर आणि चौथा कॉरिडॉर (नेरुळ/बेलापूर-खारकोपर) सेवा देत आहे.  

कोणता वर्षांत किती गाड्या१९२५    १५० दैनिक सेवा१९३५      ३३० दैनिक सेवा १९५१    ५१९ दैनिक सेवा १९६१    ५५३ दैनिक सेवा १९७१    ५८६ दैनिक सेवा १९८१    ७०३ दैनिक सेवा१९९१    १०१५ दैनिक सेवा २०११    १५७३ दैनिक सेवा २०२०     १७७४ दैनिक सेवा 

ईएमयू प्रकार व सेवेचा वर्षवार इतिहास१९२५      हार्बर मार्गावर ४-डबे १९६३     मुख्य आणि हार्बर मार्गावर ९-डबे १९८६     मुख्य मार्गावर १२-डबे१९८७     कर्जतच्या दिशेने १२-डबे२००८     १२-कार कसारा बाजूला२०१०     ट्रान्सहार्बर लाईनवर १२-डबे २०११     सर्व मेनलाईन सेवा १२ -डबे २०१६     हार्बर मार्गावर सर्व १२-डबे २०२१     हार्बर मार्गावर वातानुकूलित गाडी 

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वेमुंबई लोकलमध्य रेल्वेभारतीय रेल्वे