Mumbai Local : मुंबईकरांना लवकरच दिलासा! मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी लोकलबाबत दिली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 01:01 PM2021-02-08T13:01:29+5:302021-02-08T13:07:45+5:30

Mumbai Local Train : मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा कोणत्याही वेळेचं बंधन न ठेवता सर्वांसाठी केव्हा सुरू होणार?

mumbai local train service too start soon for all commuters says suresh kakani | Mumbai Local : मुंबईकरांना लवकरच दिलासा! मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी लोकलबाबत दिली मोठी माहिती

Mumbai Local : मुंबईकरांना लवकरच दिलासा! मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी लोकलबाबत दिली मोठी माहिती

Next

मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा (Mumbai Local Train) कोणत्याही वेळेचं बंधन न ठेवता सर्वांसाठी केव्हा सुरू होणार? असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. लोकलने सर्वसामान्यांना प्रवास करण्यासाठी दिलेल्या वेळापत्रकावर चाकरमान्यांकडून नाराजी व्यक्त होत असताना मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी लोकलच्या वेळापत्रकासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. (Mumbai Local Train Service Timetable Will Changed)

"मुंबईची लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करुन आठवडा होऊन गेला आहे. त्यानंतरही रुग्णसंख्येत काही वाढ झालेली दिसलेली नाही. ही अतिशय चांगली बाब आहे. येत्या १५ दिवसांत अशीच परिस्थिती राहिली तर लोकल सेवेचे वेळापत्रकात नक्कीच बदल केले जातील आणि मुंबईकरांना दिलासा मिळू शकेल", असं सुरेश काकाणी म्हणाले. ते मुंबईत 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलत होते.  

लोकलच्या वेळा सर्वसामान्यांच्या सोयीनुसार करण्यात येणार; राजेश टोपेंचं आश्वासन

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलसेवा सुरू करण्यात आली असली तरी यासाठी वेळेचं बंधन घालून देण्यात आलं आहे. ठरवून देण्यात आलेली वेळ चाकरमान्यांसाठी उपयोगी ठरत नसल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. यासोबत अनेक तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे सरसकट सर्वांसाठी लोकलसेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यासाठी विचार केला जात असल्याचं सांगितलं होतं. आज सुरेश काकाणी यांनीही लोकलबाबत लवकच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे. 

वीकेण्डला पूर्णवेळ रेल्वे प्रवासाला परवानगी द्या, प्रवासी संघटनांची मागणी

मुंबईत आजपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात सुरेश काकाणी यांनीही कोरोनाची लस टोचून घेतली. त्यानंतर ते बोलत होते. 

निर्धास्तपणे लस घ्यावी
"कोरोनावरील दोन्ही लस या सर्व चाचण्या घेऊनच मंजुर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण करुन घ्यावं. आतापर्यंत लस घेतलेल्यांना कोणताही त्रास झाल्याचंही समोर आलेलं नाही. मुंबईत आतापर्यंत ८० हजार जणांना लस देण्यात आली आहे", असं सरेश काकाणी यांनी सांगितलं. 

येत्या महिन्याभरात लसीकरणाचे दोन्ही टप्पे पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्यानं पहिला टप्पा सुरू असतानाच दुसरा टप्पा देखील सुरू केल्याचं काकाणी म्हणाले. 

Web Title: mumbai local train service too start soon for all commuters says suresh kakani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.