लोकलच्या पाससाठी घरबसल्या नोंदणी; कसा मिळवाल ई-पास? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 08:06 AM2021-08-13T08:06:38+5:302021-08-13T08:06:58+5:30

लसीकरणाच्या पडताळणीसाठी आता रांगेची गरज नाही

mumbai local trains maharashtra government launches e pass facility how to apply online other details | लोकलच्या पाससाठी घरबसल्या नोंदणी; कसा मिळवाल ई-पास? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

लोकलच्या पाससाठी घरबसल्या नोंदणी; कसा मिळवाल ई-पास? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

googlenewsNext

मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्यासाठीचा पास देण्याची ऑफलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता ऑनलाइन ई-पास सुविधादेखील राज्य शासनाने सुरू केली आहे. https://epassmsdma.mahait.org याद्वारे ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ घरबसल्या उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लस घेतल्याच्या नोंदणीसाठी आता रांग लावायची गरज नाही.

राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व नागरिकांना ई-पास देण्यासाठी वेब लिंक यापूर्वीच विकसित केली आहे. या वेब लिंकचा उपयोग करून मुंबईकरांना रेल्वे प्रवासासाठी ई-पास उपलब्ध होणार आहेत. ही लिंक सर्व वेब ब्राऊजरवर उपलब्ध आहे. हा ई-पास मोबाइलमध्ये जतन करून, रेल्वे तिकीट खिडकीवर सादर केल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून थेट मासिक प्रवास पास उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर पुन्हा ऑफलाइन पडताळणीची आवश्यकता राहणार नाही.

१४ दिवस पूर्ण झाल्यानंतरच पास
कोविड लसीचा दुसरा डोस घेऊन किमान १४ दिवस पूर्ण झालेले या ई -
पाससाठी पात्र असतील. त्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांचे कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची पडताळणी ह्या लिंकवर आपोआप होईल. विशेष म्हणजे दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण न झालेल्या नागरिकांनी अर्ज केल्यास त्यांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच ई-पास उपलब्ध होईल.

असा मिळावा ई पास...
पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी. त्यावर Travel Pass for Vaccinated Citizens यावर क्लिक करावे. कोविड लसीकरणासाठी नोंदविलेलाच मोबाइल क्रमांक नमूद करावा.
मोबाइलवर एसएमएसद्वारे मिळालेला ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाइल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक असा तपशील समोर दिसेल.
त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे. त्यावर अर्जदाराचा तपशील, कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याचा दिनांक असा सर्व तपशील आपोआप दिसेल.
या तपशिलामध्ये सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील ४८ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास करिता एसएमएसद्वारे लिंक प्राप्त होईल, असा संदेश झळकेल.
लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाइलमध्ये जतन करून, रेल्वे तिकीट खिडकीवर सादर करावा, त्याआधारे रेल्वे पास प्राप्त करता येईल.

Web Title: mumbai local trains maharashtra government launches e pass facility how to apply online other details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.