मुंबईच्या मध्य रेल्वेवरील कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण आणि ठाकुर्ली स्थानकादरम्यान पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतुकीवर यामुळे परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे.
तांत्रिक बिघाड संध्याकाळपर्यंत दुरुस्त न झाल्यास कामावरुन परतणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासकोंडीला सामोरं जावं लागू शकतं. मध्य रेल्वेनं दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली तर चाकरमान्यांचे मोठे हाल होतात. दुपारची वेळ असल्यानं वाहतुकीवर आता ताण कमी असला तरी बिघाड वेळीच दुरुस्त न झाल्यास संध्याकाळी प्रवाशांची अडचण होऊ शकते. मध्य रेल्वेकडून तातडीनं बिघाड दुरुस्त करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.