Mumbai Local: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना मुंबईकरांसाठी लाइफलाइन असलेली लोकल सेवा केव्हा सुरू होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच लोकलबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वाचं विधान केलं आहे. कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबईकरांचा लोकलचा प्रवास आता अजून लांबण्याची चिन्हं आहेत.
सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरु होणार?; महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टच सांगितलं
"राज्यातून कोरोना गेलेला नाही. काही जिल्ह्यात अजूनही कोरोनाची चिंताजनक स्थिती आहे. त्यामुळे स्वत:हून मृत्यूला आमंत्रण देऊ नये. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावेत. मुंबई ही राज्याची राजधानी आहे. गर्दीचं ठिकाण आहे. त्यामुळे कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही", असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम; तुर्तास सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा नाहीच
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी अद्याप सुरू करता येणार नाही असं म्हटलं होतं. पण मुंबईतील कोरोनाची स्थिती कमी झाल्यास सविस्तर बैठक घेऊनच लोकलबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे.