Mumbai Local: मुंबईत कोरोना रुग्ण वाढले, आता लोकलमध्येही होणार विना मास्क प्रवाशांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 03:03 PM2021-02-17T15:03:26+5:302021-02-17T15:04:39+5:30

Mumbai Local Covid 19 : मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांविरोधात रेल्वेतही कारवाई केली जाणार

Mumbai Local Without Mask passengers action in railway | Mumbai Local: मुंबईत कोरोना रुग्ण वाढले, आता लोकलमध्येही होणार विना मास्क प्रवाशांवर कारवाई

Mumbai Local: मुंबईत कोरोना रुग्ण वाढले, आता लोकलमध्येही होणार विना मास्क प्रवाशांवर कारवाई

Next

मुंबईत पुन्हा कोरोना डोकं वर काढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आणि प्रशासन हायअलर्ट मोडवर आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंबईची लोकल सेवा (Mumbai Local) सुरू झाल्यापासून रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांविरोधात रेल्वेतही कारवाई केली जाणार आहे. (Mumbai Local Without Mask passengers action in railway)

मुंबईच्या लोकलमध्ये मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांसाठी मनपाचे विशेष मार्शल नेमण्यात येणार आहेत. कोरोनाला वेळीच आवर घालण्यासाठी मनपाकडून प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी कठोर पद्धतीनं करण्याचं काम आता सुरू झालं आहे. मुंबईतील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर गर्दी वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. याशिवाय, मास्क वापरणं बंधनकारक असतानाही मुंबईकर मास्कचा वापर करत नसल्याचं दिसून येत आहेत. त्यामुळे बेजबाबदारी मुंबईकरांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेनं कंबर कसली आहे. 

मुंबईच्या लोकलमध्ये पुन्हा एकदा गर्दी होत आहे. त्यात प्रवाशांकडून मास्क वापरला जात नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे आता लोकलमध्ये मनपाचे मार्शन फिरणार असून विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवशांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 
 

Web Title: Mumbai Local Without Mask passengers action in railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.