Join us

Mumbai Lockdown News: मुंबई महानगरक्षेत्रात शिथिल झाले निर्बंध; जाणून घ्या आजपासून काय सुरू अन् काय बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 9:58 AM

आता दुकाने दुपारी दोनपर्यंत सुरू; मॉल्स, शाॅपिंग सेंटर, हॉटेल बंदच

मुंबई : कडक निर्बंधांनंतर कोरोनाचा संसर्ग आता झपाट्याने कमी होऊ लागल्याने १० टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी दर असलेल्या राज्यातील २० जिल्ह्यांत १ जूनपासून निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांनी याबाबतची नियमावली सोमवारी जाहीर केली. आता येथे दुपारी २ वाजेपर्यंत मॉल्स व शाॅपिंग सेंटर वगळून सर्व दुकाने सुरू राहतील.पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई ग्रामीण, डहाणू, मोखाडा या भागांत स्टेशनरी, सलून, इलेक्ट्रॉनिक्स, फोटो स्टुडिओ आदी दुकानांना काही अटी-शर्तींवर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.मुंबईत दुकानांसाठी वेळापत्रक जाहीरमुंबईतील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूची दुकाने सुरू ठेवण्याचे वेळापत्रक तयार केले आहे.ठाणे जिल्ह्यातील दुकाने खुलीठाणे जिल्ह्यातील त्या-त्या आयुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने, आस्थापना आणि उद्योग सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू करण्यास मान्यता दिली आहे.नवी मुुंबई : नवी मुंबईमध्येही मॉल्स व शाॅपिंग सेंटर वगळून इतर सर्व एकल दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुुरू ठेवण्यात येणार आहेत.रायगड : सोमवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधांबाबत आदेश काढले नव्हते. त्यामुळे व्यापारी, दुकानदार व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.-काय बंद?मॉलमल्टिप्लेक्सहॉटेलव्यायामशाळाचित्रपटगृह-काय सुरू?सर्व अत्यावश्यक वस्तूंची दुकानेमद्यविक्रीज्वेलरीहेअर सलूनसर्व प्रकारची दुकानेहार्डवेअर

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या