मातोश्रीच्या अंगणात एड. उज्वल निकम यांना आघाडी ! वर्षा गायकवाड पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 10:53 AM2024-06-04T10:53:00+5:302024-06-04T10:55:53+5:30

उज्वल निकम यांना वांद्रे पूर्व मधून ४ हजार ०१९ एवढी मते मिळाली आहेत.

mumbai lok sabha election result 2024 mahayuti candidate ujjwal nikam leads in first round maharashtra live result | मातोश्रीच्या अंगणात एड. उज्वल निकम यांना आघाडी ! वर्षा गायकवाड पिछाडीवर

मातोश्रीच्या अंगणात एड. उज्वल निकम यांना आघाडी ! वर्षा गायकवाड पिछाडीवर

श्रीकांत जाधव, मुंबई : उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील पहिल्या फेरीच्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार ऍड. उज्वल निकम यांना मातोश्रीच्या अंगणात वांद्रे पूर्व येथे आघाडी घेतली आहे. निकम यांना वांद्रे पूर्व मधून ४ हजार ०१९ एवढी मते मिळाली आहेत.

वांद्रे पूर्व येथे उद्धव ठाकरे सेनेचे सर्वाधिक कार्यकर्ते आहेत. मात्र असे असूनही वांद्रे पूर्व विधानसभेतील पहिल्या फेरीत महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना २ हजार ६१३ मते मिळाली आहे. त्यामुळें १४०५ मतानी ऍड. निकम आघाडीवर आहेत.

Web Title: mumbai lok sabha election result 2024 mahayuti candidate ujjwal nikam leads in first round maharashtra live result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.