Join us

मातोश्रीच्या अंगणात एड. उज्वल निकम यांना आघाडी ! वर्षा गायकवाड पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 10:53 AM

उज्वल निकम यांना वांद्रे पूर्व मधून ४ हजार ०१९ एवढी मते मिळाली आहेत.

श्रीकांत जाधव, मुंबई : उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील पहिल्या फेरीच्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार ऍड. उज्वल निकम यांना मातोश्रीच्या अंगणात वांद्रे पूर्व येथे आघाडी घेतली आहे. निकम यांना वांद्रे पूर्व मधून ४ हजार ०१९ एवढी मते मिळाली आहेत.

वांद्रे पूर्व येथे उद्धव ठाकरे सेनेचे सर्वाधिक कार्यकर्ते आहेत. मात्र असे असूनही वांद्रे पूर्व विधानसभेतील पहिल्या फेरीत महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना २ हजार ६१३ मते मिळाली आहे. त्यामुळें १४०५ मतानी ऍड. निकम आघाडीवर आहेत.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४ निकाललोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४उज्ज्वल निकमवर्षा गायकवाड