ठळक मुद्दे शनिवार, रविवार उड्डाणपुल कामासाठी राहणार बंद.
मुंबई : वरळीतील डॉ. अँनी बेझेंट मार्गावरील उत्तर वाहिनीवरील लव्ह ग्रोव्ह उड्डाणपुलाचे नादुरूस्त बेअरिंग बदलण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ३ जुलै रोजी सायंकाळी ७ पासून हाती घेतले आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे सदर उड्डाणपूल शनिवार व रविवार ( ४जुलै ) वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहील.
पहिला ट्रॅफिक ब्लॉक संपल्यावर सोमवारी सकाळी उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात येईल. उड्डाणपुलाचे ५१ बेअरिंग बदलण्यात येणार असून सहा टप्प्यात काम विभागले आहे. दर शनिवार व रविवारी काम हाती घेण्यात येइल. मुंबई वाहुतक पोलिसांनी ट्रॅफिक ब्लॉकला मंजुरी दिली असून नियोजित वेळापत्रकानुसार ८ ऑगस्ट रोजी काम पूर्ण होईल.