मुंबई : मुंबई शहरातील सर्वात महागडा विभाग अशी ओळख असलेल्या मलबार हिल परिसराने सरत्या वर्षातही आपली श्रीमंती कायम राखली असून, सरत्या वर्षात तिथे विक्री झालेल्या ५२ घरांच्या माध्यमातून तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आहे.
गृहनिर्माण क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षात मलबार हिल, खंबाला हिल आणि वाळकेश्वर या दक्षिण मुंबईतील आलिशान परिसरात १४ नव्या गृहनिर्माण प्रकल्पांची निर्मिती सुरू झाली.
जे प्रकल्प तयार झाले. त्यातील एकूण ५२ घरांची विक्री झाली आहे. किमान थ्री बीएचके, फोर बीएचके, फाईव्ह बीएचके तसेच पेंट हाऊस अशा घरांच्या विक्रीचा समावेश आहे.
मुंबईच्या प्रॉपर्टी बाजाराने यंदा नवा विक्रम रचला असून चालू वर्षात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्य मुंबईत तब्बल १ लाख २७ हजार १३९ मालमत्तांची विक्री झाली आहे. मालमत्ताची विक्री ही मध्य मुंबई व पश्चिम मुंबईत झाली आहे.प्रमाण यंदाच्यावर्षी झालेल्या मालमत्ता व्यवहारांमध्ये निवासी मालमत्तांचे आहे.व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. १०,८८९ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला मालमत्तांच्या व्यवहारात मिळाला आहे.
किमान आकाराच्या घरांसाठी लोकांनी ३५ कोटी रुपये मोजले आहेत. तर कमाल आकारमानाच्या घरांसाठी १५० कोटी रुपयांपर्यंत पैसे आकारले गेले आहेत. १५० कोटी रुपये किंमत असलेल्या ६ घरांची विक्री झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, सरत्या वर्षात मलबार हिल परिसरातील घरांच्या प्रतिचौरस फूट दरांमध्ये २०२२च्या तुलनेत १० टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी या परिसरात किमान ९५ हजार २४० रुपये प्रतिचौरस फूट ते एक लाख रुपये प्रतिचौरस फूट दराने लोकांनी घर खरेदीसाठी पैसे मोजले आहेत.