व्हॉट्सअॅपवर चॅट करणं बेतलं जीवावर; अंधेरीत पतीने केली पत्नीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 11:20 IST2019-04-11T11:16:15+5:302019-04-11T11:20:50+5:30
पत्नी सतत व्हॉट्सअॅपवर चॅटींग करत असल्याच्या रागातून पतीने तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अंधेरीत गुरुवारी (11 एप्रिल) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

व्हॉट्सअॅपवर चॅट करणं बेतलं जीवावर; अंधेरीत पतीने केली पत्नीची हत्या
मुंबई - पत्नी सतत व्हॉट्सअॅपवर चॅटींग करत असल्याच्या रागातून पतीने तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अंधेरीत गुरुवारी (11 एप्रिल) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. कामगार हॉस्पिटल वसाहतीत चेतन चौगुले (33) आणि त्याची पत्नी आरती (22) हे राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन आणि आरती यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्यांना एक मुलगा आहे. बेरोजगार असलेल्या चेतनला आरतीच्या सतत सोशल साईटवर सक्रिय असण्याची चीड होती. त्याबाबत त्याने तिला अनेकदा समजही दिली. मात्र ती त्याला जुमानत नव्हती. अखेर गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास त्याने नायलॉनच्या दोरीने आरतीचा गळा आवळत तिची हत्या केली आणि पोलिसांकडे जाऊन गुन्हा कबुल केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.