Join us

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे पुरस्कार जाहीर; आज वितरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 11:03 AM

भरत जाधव, स्वप्नील जाधव, शीतल तळपदे यांचा सन्मान.

मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा शतकोत्सवी रौप्य महोत्सवी वार्षिकोत्सव ६ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता दादर येथील शारदा मंगल सभागृहात होणार आहे. साहित्य, नाट्य व सर्वोत्कृष्ट कर्मचारी पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. भरत जाधव, स्वप्नील जाधव, शीतल तळपदे यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

हा सोहळा ज्येष्ठ साहित्यिक व ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पारितोषिकांचे वितरणही करण्यात येणार आहे.

१) ‘अस्तित्व’ नाटकातील भूमिकेसाठी भरत जाधव यांना सर्वोत्कृष्ट कलावंत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. स्वप्नील जाधव यांना नटवर्य मामा पेंडसे उत्कृष्ट नाटककार पुरस्काराने गौरविण्यात येईल.

२)  १५ वर्षे रंगभूमीशी निगडीत असलेल्या रंगकर्मीला दिला जाणारा नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत नटवर्य केशवराव दाते जीवनगौरव पुरस्कार प्रकाश योजनाकार शीतल तळपदे यांना जाहीर झाला आहे.

३)  पत्रकार-समीक्षक शीतल करदेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. प्रा. वि. ह. कुळकर्णी पुरस्कार किरण शिवहर डोंगरदिवे यांच्या देशभक्त हि. सो. ऊर्फ बाबुराव पाटील या चरित्र ग्रंथाला जाहीर झाला आहे. 

४) यासाठी प्रा. सुहासिनी किर्तीकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. सर्वोत्कृष्ट सेवेसाठी १२ कर्मचाऱ्यांना रा. को. फाटक, रामचंद्र डिंगे, चंद्रिका नाडकर्णी, जयश्री पावसकर आणि त्रिंबक एरंडे पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबईभरत जाधवमराठी अभिनेता