मुंबई श्रीमंत दिसत असली, तरी आहे गरीबच!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 10:33 AM2021-12-27T10:33:45+5:302021-12-27T10:35:06+5:30

Mumbai : महागाईच्या तुलनेत पगार वाढत नाही. मागणी पूर्ण करताना प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करता येत नाही. आजचे जगणे उद्यावर ढकले जाते, अशी मुंबईची अवस्था आहे.

Mumbai may look rich, but it is poor! | मुंबई श्रीमंत दिसत असली, तरी आहे गरीबच!

मुंबई श्रीमंत दिसत असली, तरी आहे गरीबच!

googlenewsNext

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईकडे जागतिक दर्जाचे श्रीमंत शहर या दृष्टिकोनातून पाहिले जाते. प्रत्यक्षात मात्र तसे नाही. येथील संपत्ती मूठभर लोकांच्या हाती एकवटली आहे. बाकीच्या कष्टकरी वर्गाची मात्र दैनंदिन गरजा पूर्ण करताना दमछाक होत आहे. 
महागाईच्या तुलनेत पगार वाढत नाही. मागणी पूर्ण करताना प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करता येत नाही. आजचे जगणे उद्यावर ढकले जाते, अशी मुंबईची अवस्था आहे. परिणामी, धनिकांची आणि कष्टकऱ्यांची मुंबई श्रीमंत दिसत असली, तरी आहे गरीबच. कोकण विभागात रायगड जिल्ह्यांचा गरिबी निर्देशांक  १०.१९% आहे. तर ठाणे १५.२४, सिंधुदुर्ग १५.३९, रत्नागिरी जिल्ह्याचा गरिबी निर्देशांक १८.४७ टक्के आहे. 

आमचा गरिबी निर्देशांक किती ? 
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन जिल्हे मुंबईमध्ये आहेत. यात मुंबई शहराचा गरिबी निर्देशांक 

कशी होणार गरिबी कमी? : प्रत्येकाला पुरेसा रोजगार मिळाला पाहिजे. केवळ रोजगार नाही तर पुरेसे वेतन मिळाले पाहिजे.  प्रत्येकाने आपल्या दैनंदिन गरजा ओळखून व्यवहार करत बचत केली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे एवढ्याशा पगारात कोणाचेच भागत नाही. त्यामुळे महागाई कमी झाली पाहिजे. - जगदीश पाटणकर

विभागात सर्वाधिक गरीब कोण ?
कोकण विभागात रायगड जिल्ह्यांचा गरिबी निर्देशांक १०.१९% आहे. तर ठाणे १५.२४, सिंधुदुर्ग १५.३९, रत्नागिरी जिल्ह्याचा गरिबी निर्देशांक १८.४७ टक्के आहे. कोकण विभागात सर्वाधिक गरीब जिल्हा रायगड आहे.

राज्यात पहिल्या दहामध्ये कोण?
नंदुरबार     : ५२.१२ टक्के
धुळे     : ३३.२३ टक्के
जालना     : २९.४१ टक्के
हिंगोली     : २८.५ टक्के
नांदेड     : २७.४८ टक्के
यवतमाळ     : २३.५४ टक्के
परभणी     : २३.३९ टक्के
बीड     : २२.६६ टक्के
वाशिम     : २२.५३ टक्के
गडचिरोली     : २०.५८ टक्के


म्हणून वाढली जिल्ह्यातील गरिबी (टक्क्यांत)
    मुंबई शहर     उपनगर

आहार     ३.१५     ४.३६
कौटुंबिक आरोग्य     १.५०     ३.५४
मालमत्ता     ०.९९     १.५५
बँक खाते     १.८७     २.८९
शालेय हजेरी     १.५०     १.०१
स्वयंपाकाची साधने     ०.३५     ०.१५
शौचालय     ३.२२     ४.६५
घरे     ०.२४     ०.२५
पिण्याचे पाणी     ०.०९     ०.००
वीज     ०.२६     ०.५०

प्रत्येकाला सरकारी सेवा मिळाल्या पाहिजे. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. महागाई कमी झाली पाहिजे. महागाई दहा टक्क्यांनी वाढते. पगार एक टक्क्याने वाढतो. कसे घर चालणार. दैनंदिन खर्च भागवितानादेखील नाकीनऊ येतात. 
- सुरेंद्र मोरे

Web Title: Mumbai may look rich, but it is poor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई