Join us

मुंबई श्रीमंत दिसत असली, तरी आहे गरीबच!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 10:33 AM

Mumbai : महागाईच्या तुलनेत पगार वाढत नाही. मागणी पूर्ण करताना प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करता येत नाही. आजचे जगणे उद्यावर ढकले जाते, अशी मुंबईची अवस्था आहे.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईकडे जागतिक दर्जाचे श्रीमंत शहर या दृष्टिकोनातून पाहिले जाते. प्रत्यक्षात मात्र तसे नाही. येथील संपत्ती मूठभर लोकांच्या हाती एकवटली आहे. बाकीच्या कष्टकरी वर्गाची मात्र दैनंदिन गरजा पूर्ण करताना दमछाक होत आहे. महागाईच्या तुलनेत पगार वाढत नाही. मागणी पूर्ण करताना प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करता येत नाही. आजचे जगणे उद्यावर ढकले जाते, अशी मुंबईची अवस्था आहे. परिणामी, धनिकांची आणि कष्टकऱ्यांची मुंबई श्रीमंत दिसत असली, तरी आहे गरीबच. कोकण विभागात रायगड जिल्ह्यांचा गरिबी निर्देशांक  १०.१९% आहे. तर ठाणे १५.२४, सिंधुदुर्ग १५.३९, रत्नागिरी जिल्ह्याचा गरिबी निर्देशांक १८.४७ टक्के आहे. 

आमचा गरिबी निर्देशांक किती ? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन जिल्हे मुंबईमध्ये आहेत. यात मुंबई शहराचा गरिबी निर्देशांक 

कशी होणार गरिबी कमी? : प्रत्येकाला पुरेसा रोजगार मिळाला पाहिजे. केवळ रोजगार नाही तर पुरेसे वेतन मिळाले पाहिजे.  प्रत्येकाने आपल्या दैनंदिन गरजा ओळखून व्यवहार करत बचत केली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे एवढ्याशा पगारात कोणाचेच भागत नाही. त्यामुळे महागाई कमी झाली पाहिजे. - जगदीश पाटणकर

विभागात सर्वाधिक गरीब कोण ?कोकण विभागात रायगड जिल्ह्यांचा गरिबी निर्देशांक १०.१९% आहे. तर ठाणे १५.२४, सिंधुदुर्ग १५.३९, रत्नागिरी जिल्ह्याचा गरिबी निर्देशांक १८.४७ टक्के आहे. कोकण विभागात सर्वाधिक गरीब जिल्हा रायगड आहे.

राज्यात पहिल्या दहामध्ये कोण?नंदुरबार     : ५२.१२ टक्केधुळे     : ३३.२३ टक्केजालना     : २९.४१ टक्केहिंगोली     : २८.५ टक्केनांदेड     : २७.४८ टक्केयवतमाळ     : २३.५४ टक्केपरभणी     : २३.३९ टक्केबीड     : २२.६६ टक्केवाशिम     : २२.५३ टक्केगडचिरोली     : २०.५८ टक्के

म्हणून वाढली जिल्ह्यातील गरिबी (टक्क्यांत)    मुंबई शहर     उपनगरआहार     ३.१५     ४.३६कौटुंबिक आरोग्य     १.५०     ३.५४मालमत्ता     ०.९९     १.५५बँक खाते     १.८७     २.८९शालेय हजेरी     १.५०     १.०१स्वयंपाकाची साधने     ०.३५     ०.१५शौचालय     ३.२२     ४.६५घरे     ०.२४     ०.२५पिण्याचे पाणी     ०.०९     ०.००वीज     ०.२६     ०.५०

प्रत्येकाला सरकारी सेवा मिळाल्या पाहिजे. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. महागाई कमी झाली पाहिजे. महागाई दहा टक्क्यांनी वाढते. पगार एक टक्क्याने वाढतो. कसे घर चालणार. दैनंदिन खर्च भागवितानादेखील नाकीनऊ येतात. - सुरेंद्र मोरे

टॅग्स :मुंबई