महापौर किशोरी पेडणेकर कोरोना पॉझिटिव्ह; लक्षणं नसल्यानं होम क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 01:08 PM2020-09-10T13:08:46+5:302020-09-10T13:24:03+5:30
लक्षणं नसल्यानं घरातच विलगीकरणात राहण्याचा निर्णय
Next
मुंबई: महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोणतीही लक्षणं नसल्यानं त्यांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. महापौरांच्या घरातील सदस्यांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 10, 2020
माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली.
आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन pic.twitter.com/ayW43cXGrj
महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवरून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. 'मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली. कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे. माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन,' अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.
मुंबईत कोरोनाचा कहर वाढतच आहे. काल दिवसभरात शहरात २ हजार २२७ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख ६० हजारांवर पोहोचली. ७४ दिवसांपूर्वी मुंबईत २ हजार ७७ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तो विक्रम काल मोडीत निघाला. काल शहरात ४३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ७ हजार ९८५ वर पोहोचला आहे.