Mumbai mega block 18 december 2022: मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मात्र दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 06:39 AM2022-12-17T06:39:06+5:302022-12-17T06:39:28+5:30

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी  मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai mega block 18 december 2022 in marathi: Megablock tomorrow on Central and Harbor Railways; But relief on the Western Railway | Mumbai mega block 18 december 2022: मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मात्र दिलासा 

Mumbai mega block 18 december 2022: मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मात्र दिलासा 

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी  मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे 
 कुठे? : माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर
 कधी? : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत
 परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८  या वेळेत  सुटणाऱ्या उपनगरी धीम्या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. 
 या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर  थांबतील. त्यानंतर  मुलुंड स्थानकापासून पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील उपनगरी गाड्या मुलुंड स्थानकापासून अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबून पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

हार्बर मार्ग 
 कुठे? : पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर
 कधी? : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून)
 परिणाम : पनवेल/बेलापूर येथून सकाळी १०.३३  ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत  सुटणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
 पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत  सुटून  ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
 ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशीदरम्यान विशेष उपनगरी (लोकल) ट्रेन चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असेल.
 ब्लॉक कालावधीत बेलापूर/ नेरुळ - खारकोपर मार्गावर लोकल उपलब्ध असतील.

Web Title: Mumbai mega block 18 december 2022 in marathi: Megablock tomorrow on Central and Harbor Railways; But relief on the Western Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.