मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल ब्लॉक, पाहा वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 09:44 AM2024-06-08T09:44:17+5:302024-06-08T09:49:37+5:30
येत्या रविवारी पश्चिम रेल्वे तसेच मध्य रेल्वेच्या मेन लाईनसह हार्बर रेल्वेमार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांच्या मनस्तापात भरच पडणार आहे.
Mumbai Mega Block Update : रेल्वे ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रविवार, ९ जून रोजी सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ वाजेपर्यंत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर पाच तासांचा ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे - चर्चगेट - मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान ‘ब्लाॅक
या कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सर्व जलद मार्गांवरील गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील. ‘ब्लॉक’मुळे अप आणि डाउन दिशेच्या काही लोकल रद्द करण्यात येतील. तर, काही चर्चगेट लोकल वांद्रे, दादर स्थानकापर्यंत चालवून माघारी पाठवल्या जातील.
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर सीएसएमटी - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे - सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक आहे.
सीएसएमटी येथून सकाळी ११.०४ ते दुपारी २.४६ पर्यंत डाऊन धीमी सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबतील. पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर लोकल वळविण्यात येईल. घाटकोपर येथून सकाळी ११.१४ ते दुपारी २.४८ पर्यंत सुटणाऱ्या अप धीमी सेवा विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबेल.
हार्बर मार्ग-
सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी / बेलापूर / पनवेल येथून सीएसएमटी / वडाळा रोडवरून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे / गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत बंद राहतील. पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव / वांद्रे येथून सुटणाऱ्या सीएसएमटीसाठी सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
डाउन धीम्या मार्गावर-
१) ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण आहे. सकाळी १०.४८ वाजता सीएसएमटी येथून सुटेल.
२) ब्लॉकनंतर पहिली लोकल टिटवाळा आहे. सीएसएमटी येथून दुपारी ३.०९ वाजता सुटेल.
अप धीम्या मार्गावर-
१) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण येथून सकाळी ९.५५ वाजता सुटेल.
२) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण येथून दुपारी २.०८ वाजता सुटेल.
डाउन हार्बर मार्गावर-
१) ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल सीएसएमटी येथून सकाळी ११.०४ वाजता सुटेल.
२) गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल सीएसएमटी येथून सकाळी १०.२२ वाजता सुटेल.
३) ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल सीएसएमटी येथून दुपारी ४.५१ वाजता सुटेल.
४) ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटी येथून ४.५६ वाजता वांद्रेसाठी सुटेल.
अप हार्बर मार्गावर-
१) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी ९.४० वाजता सुटेल.
२) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.
३) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३.२८ वाजता सुटेल.
४) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगाव येथून दुपारी ४.५८ वाजता सुटेल.