मध्य रेल्वेवर रविवारी होणार प्रवाशांचे हाल; माटुंगा-मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 05:58 AM2023-04-15T05:58:44+5:302023-04-15T05:59:26+5:30
हार्बर आणि पश्चिम या दोन रेल्वे मार्गांवर मात्र मेगाब्लॉक नसेल. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.
मुंबई :
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १६ एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर आणि पश्चिम या दोन रेल्वे मार्गांवर मात्र मेगाब्लॉक नसेल. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.
मध्य रेल्वे
कुठे ? माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी? सकाळी ११ .०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.