Mumbai Mega Block : मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंडदरम्यान अप आणि डाउन धिम्यामार्गावर, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० पर्यंत अप हार्बर मार्गावर आणि सकाळी ११:४० ते सायंकाळी ४:४० पर्यंत डाउन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.
सीएसएमटी येथून सकाळी ११:१६ ते सायंकाळी ४:४७ पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी १०:४८ ते सायं. ४:४३ वाजेपर्यंत वांद्रे-गोरेगाव येथे जाणाऱ्या-सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी ९:५३ ते दुपारी ३:२० पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सकाळी १०:४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत कुर्ला-पनवेल दरम्यान २० मिनिटांच्या वारंवारतेने सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची प्रवाशांना परवानगी आहे.
१) डाउन धिम्या मार्गावर :
ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा आहे. सीएसएमटी येथून सकाळी ९:५३ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल आसनगाव लोकल आहे. सीएसएमटी येथून दुपारी ३:३२ वाजता सुटेल.
२) डाउन हार्बर मार्गावर :
ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल सीएसएमटी येथून सकाळी ११:०४ वाजता सुटेल. गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटी येथून सकाळी १०:२२ वाजता सुटेल.
३) अप हार्बर मार्गावर :
सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी ०९:४० वाजता सुटेल. सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०:२० वाजता सुटेल.