Join us

मुंबईकरांनो, उद्या लोकल प्रवास करण्याआधी माहिती घ्या! मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 9:42 AM

डाऊन जलद-सेमी जलद लोकल धिम्या मार्गावर.

Mumbai Mega Block On Sunday : मध्य रेल्वेवर रविवारी अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडताना विचार करावा. ठाणे ते दिवा दरम्यान ५ आणि ६ व्या लाईनवर सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० पर्यंत तर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल.

डाऊन जलद- सेमी जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकावर थांबतील. अप जलद - सेमी जलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबतील. पनवेल , बेलापूर, वाशीसाठी सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सीएसएमटीकडे सुटणाऱ्या पनवेल, बेलापूर, वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द आहेत. सीएसएमटी- कुर्ला आणि पनवेल - वाशी या मार्गावर विशेष गाड्या धावतील. हार्बरवरील प्रवाशांना ठाणे - वाशी,  नेरुळ स्थानकांदरम्यान १० ते संध्याकाळी ६ पर्यंत प्रवासाची परवानगी आहे. 

 मेमू सेवा स्थगित -

१) वसई रोड-दिवा वसई रोडवरून सकाळी ९.५० वाजता सुटणारी गाडी कोपरपर्यंत चालेल. कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान रद्द राहील.

२) वसई रोड-दिवा वसई रोडवरून दुपारी १२.५५ वाजता सुटणारी गाडी कोपरपर्यंत चालेल. कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान रद्द राहील.

३) दिवा-वसई रोड कोपर येथून सकाळी ११.४५ वाजता सुटेल. वसई रोडकडे चालेल. १२.३० वाजता पोहोचेल. दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान रद्द राहील.

४) दिवा-वसई रोड कोपर येथून दुपारी २.४५ वाजता सुटेल. वसई रोडपर्यंत चालेल. ३.२५ वाजता पोहोचेल. दिवा आणि कोपर स्थानकांदरम्यान रद्द राहील.

५) रत्नागिरी-दिवा जलद पॅसेंजर पनवेल येथे स्थगित होईल.

डाऊन हार्बर मार्गावर-

१) ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१८ वाजता सुटेल.

२) ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ३.४४ वाजता सुटेल.

अप हार्बर मार्गावर-

१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी १०.०५ वाजता पनवेल येथून सुटणार आहे.

२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी ३.४५ वाजता पनवेल येथून सुटणार आहे.

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेहार्बर रेल्वे