Mumbai 23 June Mega Block : मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. यामुळे मुंबईकरांना नियोजन करूनच घराबाहेर पडावे लागणार आहे.
सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.२४ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या लोकल सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. धिम्या मार्गावरील गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. पुढे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.
सीएसएमटीसाठी / वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ दरम्यान वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल बंद राहतील. सीएसएमटीसाठी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वांद्रे / गोरेगाव डाऊन हार्बर मार्गावरील लोकल बंद राहतील.
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागांदरम्यान विशेष लोकलचालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी / नेरुळ स्थानकावरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
माहीम-गोरेगावदरम्यान ब्लॉक-
पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर माहीम आणि गोरेगाव स्थानकादरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान अप व डाउनवर ब्लॉक आहे. या काळात सीएसएमटी-वांद्रे-सीएसएमटी, सीएसएमटी-पनवेल-गोरेगाव-सीएसएमटी / पनवेल-गोरेगाव-सीएसएमटी / पनवेलसोबत चर्चगेट-गोरेगाव-चर्चगेट धीम्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
डाऊन धिम्या मार्गावर-
१) सीएसएमटी येथून सकाळी १०.१८ वाजता सुटणारी ठाणे लोकल डाऊन धिम्या मार्गावरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल असेल.
२) सीएसएमटी येथून दुपारी ३.३२ वाजता सुटणारी आसनगाव लोकल ब्लॉकनंतर पहिली लोकल असेल.
अप धिम्या मार्गावर-
१) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण येथून सकाळी ९.१३ वाजता सुटेल.
२) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण येथून दुपारी २.३३ वाजता सुटेल.
डाऊन हार्बर-
१) सीएसएमटी येथून ब्लॉकपूर्वीची पनवेलसाठीची शेवटची लोकल सकाळी ११.०४ वाजता असेल.
२) सीएसएमटी येथून गोरेगावसाठी शेवटची लोकल सकाळी १०.२२ वाजता असेल.
३) ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली सीएसएमटी येथून दुपारी ४.५१ वाजता सुटेल.
४) ब्लॉकनंतर पहिली लोकल वांद्रे असून, सीएसएमटी येथून दुपारी ४.५६ वाजता सुटेल.
अप हार्बर-
१) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी ९.४० वाजता सुटेल.
२) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.
३) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३.२८ वाजता सुटेल.
४) गोरेगाव येथून ब्लॉकनंतर दुपारी ४.५८ वाजता सीएसएमटीसाठी पहिली लोकल सुटेल.