मुंबई मेट्रो 3 : विद्युत-यांत्रिक प्रणालींसाठी एमएमआरसीचा ब्ल्यू स्टार कंपनीसोबत करार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 01:41 PM2018-12-04T13:41:46+5:302018-12-04T13:42:05+5:30
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कुलाबा-वांद्रे-सीप्झ : मेट्रो ३ प्रकल्पाचा डेपो आणि आरे स्थानक यांच्या विद्युत-यांत्रिक प्रणालींसाठी ब्लू स्टार कंपनीसोबतचा करार संपन्न झाला आहे.
मुंबई - मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनने कुलाबा-वांद्रे-सीप्झ : मेट्रो ३ प्रकल्पाचा डेपो आणि आरे स्थानक यांच्या विद्युत-यांत्रिक प्रणालींसाठी ब्लू स्टार कंपनीसोबतचा करार संपन्न झाला आहे. अत्याधुनिक विद्युत यंत्रणा, वातानुकूल यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा, विद्युत ओव्हरहेड क्रेन, प्लम्बिंग, व्हेंटिलेशन, एअर कंप्रेसर प्रणाली आणि इमारत व्यवस्थापन यंत्रणा (बीएमएस) निर्माण करण्यासाठी तंत्रशुद्ध तसेच व्यापक दृष्टिकोनातून एमएमआरसीने आखणी केली आहे. ती प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे.
याविषयी बोलताना एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्या, "आरे स्थानक आणि डेपोची विद्युत-यांत्रिक प्रणाली तंत्रशुद्ध असणं मुंबई मेट्रो ३ प्रकल्पासाठी अत्यावश्यक आहे. याकरिता अशा अद्ययावत यंत्रणेची अंमलबजावणी करण्याचे आमचे ध्येय आहे. त्यादृष्टीने हे एक पुढचे पाऊल आहे . हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."