Mumbai Metro 3: कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३, ८ डब्यांच्या पहिल्या ट्रेनची जोडणी पूर्ण, अशी दिसे मेट्रो-३

By सचिन लुंगसे | Published: August 8, 2022 04:44 PM2022-08-08T16:44:36+5:302022-08-08T16:45:46+5:30

Colaba-Bandre-Seepz Metro-3:

Mumbai Metro 3: Colaba-Bandre-Seepz Metro-3, connection of first train of 8 coaches complete, Metro-3 looks like this | Mumbai Metro 3: कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३, ८ डब्यांच्या पहिल्या ट्रेनची जोडणी पूर्ण, अशी दिसे मेट्रो-३

Mumbai Metro 3: कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३, ८ डब्यांच्या पहिल्या ट्रेनची जोडणी पूर्ण, अशी दिसे मेट्रो-३

googlenewsNext

-सचिन लुंगसे 
मुंबई -  कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्ग-३ साठी ८ डब्यांची पहिली प्रोटोटाईप ट्रेन बॅटरी-चलित शन्टरने यशस्वीपणे जोडली गेली आहे. मुं.मे.रे.कॉ. च्या कार डेपोसाठी केलेली ही पहिली खरेदी आहे. या शन्टरने मुं.मे.रे.कॉ. द्वारे सारीपूत नगर, आरे, येथे "ट्रेन डिलिव्हरी आणि चाचणी ट्रेकसाठी उभारलेल्या तात्पुरत्या सुविधेमध्ये पहिल्या ८ डब्यांच्या ट्रेनची जुळवणी केली.

छोट्या अद्भूत शन्टरची क्षमता ३५० टन वजन खेचण्याची आहे. बॅटरी पूर्णपणे चार्ज असताना हे शन्टर ८ डब्यांची ट्रेन ९ कि.मी.पर्यंत खेचू शकते. तसेच हे शन्टर सतत ५० किलो न्यूटन क्षमतेने काम करू शकते. या शन्टरची त्याच्या स्वयंचलित कप्लर तसेच अर्धस्थायी कप्लर अडॉप्टरसह यशस्वीरीत्या चाचणी करण्यात आली. दोन्ही कप्लर मेट्रो डबे जोडण्यासाठी वापरले जातात. ठाणे येथील मे. रेनमॅक इंडिया प्रा.लि. यांनी नेदरलँड्सच्या एन.आय.टी.इ.क्यू. संस्थेसोबतच्या संयुक्त उपक्रम आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करारांतर्गत मेक-इन-इंडियाच्या धोरणाचा एक भाग म्हणून या रेल कम रोड शन्टरची पूर्णपणे निर्मिती केली आहे.

Web Title: Mumbai Metro 3: Colaba-Bandre-Seepz Metro-3, connection of first train of 8 coaches complete, Metro-3 looks like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.