मोठी बातमी! मुंबई 'मेट्रो-३'च्या उद्घाटनाची तारीख ठरली, विनोद तावडेंचं ट्विट; दाखवली पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 01:05 PM2024-07-17T13:05:45+5:302024-07-17T13:07:18+5:30

Mumbai Metro Line 3: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी अशा मुंबई मेट्रो-३ अर्थात भुयारी मेट्रोच्या उदघाटनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे.

Mumbai Metro 3 inauguration on 24 july Vinod Tawde tweet First glimpse shown | मोठी बातमी! मुंबई 'मेट्रो-३'च्या उद्घाटनाची तारीख ठरली, विनोद तावडेंचं ट्विट; दाखवली पहिली झलक

मोठी बातमी! मुंबई 'मेट्रो-३'च्या उद्घाटनाची तारीख ठरली, विनोद तावडेंचं ट्विट; दाखवली पहिली झलक

मुंबई

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी अशा मुंबई मेट्रो-३ अर्थात भुयारी मेट्रोच्या उदघाटनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. बुधवार २४ जुलै रोजी भूमिगत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

विनोद तावडे यांनी मुंबई मेट्रो-३ ची पहिली झलक दाखवणारा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. येत्या २४ जुलैपासून मुंबई मेट्रो-३ मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची महत्वाची माहिती त्यांनी ट्विटमधून दिली आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांचं जीवन आणखी सुखदायी बनवण्याची गॅरंटी दिली होती. ती आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. मुंबईला आपली पहिलीवहिली भूमिगत मेट्रो (अॅक्वा लाइन) २४ जुलैपासून मिळणार आहे. जी शहराच्या वेगाला नवी भरारी देणार आहे", असं ट्विट विनोद तावडे यांनी केलं आहे. 

मुंबई मेट्रो-३ प्रकल्प मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पात आतापर्यंत अनेक अडचणी देखील आल्या होत्या. आरे कारशेडचा मुद्दा गाजला होता. तसंच पूर्णपणे भुयारी मार्ग असल्यानं कामात अनेक अडचणींचा सामना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला करावा लागला आहे. सगळे अडथळे पार करत अखेर सीप्झ ते बीकेसी असा पहिला टप्पा २४ जुलै पासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. 

Web Title: Mumbai Metro 3 inauguration on 24 july Vinod Tawde tweet First glimpse shown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.