कुलाबा ते सीप्झ मेट्रो-३ मार्गिकेचे (Mumbai Metro 3 Aqua Line) लोकार्पण ५ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी ही वाहतूक ६ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार या पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी या प्रवासासाठी ५० रुपये तिकीट आकारले जाणार आहे. या मार्गावर सर्वात कमी तिकीट १० रुपये असणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (MMRC) ३३.५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात असून त्यावर एकूण २७ स्थानके असतील. या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी हा मार्ग सुरू होत असून त्यावर १० स्थानके आहेत. हा मार्ग १२.२ किमी लांबीचा आहे. या मार्गिकेवर सर्वात कमी तिकीट दर हे १० रुपये असेल, तर आरे ते बीकेसी प्रवासासाठी मुंबईकरांना ५० रुपये मोजावे लागणार आहेत.
कुठे किती भाडे?१. आरे जेव्हीएलआर ते मरोळ नाक्यापर्यंतच्या अंतरासाठी प्रवाशांना २० रुपये भाडे द्यावे लागणार आहे. तर आरे जेव्हीएलआर स्थानकापासून विमानतळ टी १ टर्मिनल स्थानकापर्यंत ३० रुपये भाडे आकारले जाणार आहे. २. त्यातच वांद्रे कॉलनी स्थानकापर्यंतच्या प्रवासासाठी प्रवाशांना ४० रुपये मोजावे लागणार आहेत.
कधी सुटणार गाडी?- मेट्रो-३ मार्गिकेवरुन पहिली गाडी सकाळी ६.३० वाजता सुटेल- शेवटची गाडी रात्री १०.३० वाजता सुटेल
पहिल्या टप्प्यात कोणकोणती स्थानकं?- सीप्झ- एमआयडीसी अंधेरी- मरोळ नाका- सीएसएमआयए टी२- सहार रोड- सीएसएमआयए टी१- सांताक्रूझ- वांद्रे कॉलनी- बीकेसी