- सचिन लुंगसे
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड सोबत त्यांच्या दोन मेट्रो लाईन म्हणजे मेट्रो २ अ (दहिसर - डी एन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व - अंधेरी पूर्व) सोबत भागीदारी करार केला आहे. याद्वारे दरवर्षी १२ कोटी युनिटपेक्षा अधिक वीज अदानी इलेक्ट्रिसिटी कडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला पुरवली जाणार आहे.
देशातील इतर शहरांप्रमाणे मुंबईतील वीज वितरणाची रचना ही जटिल प्रकारची आहे. महाराष्ट्रात बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट आणि राज्य वीज वितरण उपक्रम म्हणजेच महावितरण या दोन प्रमुख सार्वजनिक कंपन्यांसह - टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यासारखे अनेक वीज वितरक आहेत.
अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड ही कंपनी मुंबई उपनगरातील ३१ लाखांहून अधिक घरांना तसेच व्यावसायिकांना वीज पुरवते. विस्तृत अशा वीज वितरण जाळ्यामुळे ९९.९९५% विश्वासार्हतेसह अदाणी इलेक्ट्रिसिटी ही ग्राहकांसाठी एक पसंतीची वीज पुरवठादार कंपनी बनली आहे. कंपनी स्पर्धकांच्या ८०% पेक्षा अधिक ग्राहकांनादेखील सेवा देते.
गेल्या काही वर्षांत विमानतळ, डेटा सेंटर, रुग्णालय, मेट्रो रेल्वे, सॉफ्टवेअर पार्क आणि हॉटेलसारख्या ऊर्जा-केंद्रित आस्थापनांनी अदानी इलेक्ट्रिसिटीला त्यांची प्रमुख पुरवठादार कंपनी म्हणून निवडले आहे. याद्वारे समर्थित स्पर्धात्मक दरांमध्ये विश्वासार्ह आणि शाश्वत वीज पुरवठ्यामुळे तसेच ग्राहक-केंद्रित सेवा देत आहे, असे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले.आम्हाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मुंबईच्या मेट्रो प्रवाशांना सेवा देताना आनंद होत आहे. आणि वातावरणातील कार्बनचे अस्तित्व कमी करण्यातील साहाय्यासाठी आमचे शाश्वत उपाय हे नेहमीच भिन्न राहिले आहेत.- अदानी इलेक्ट्रिसिटी