मुंबई मेट्रोने ओलांडला ४० कोटी प्रवाशांचा पल्ला, अंधेरी-पश्चिम द्रुतगती महामार्गावर सर्वाधिक गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 10:34 PM2018-04-30T22:34:25+5:302018-04-30T22:34:25+5:30
अंधेरी ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या मेट्रो मार्गावर गतवर्षीच्या तुलनेत ७८ हजार ७९० प्रवासी वाढले आहेत. यामुळे हा मेट्रो टप्पा सर्वाधिक वर्दळीचा ठरला आहे.
मुंबई : अंधेरी ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या मेट्रो मार्गावर गतवर्षीच्या तुलनेत ७८ हजार ७९० प्रवासी वाढले आहेत. यामुळे हा मेट्रो टप्पा सर्वाधिक वर्दळीचा ठरला आहे. मुंबई मेट्रो सुरू झाल्यापासून आतापर्यंत (सोमवारपर्यंत) म्हणजेच १ हजार ४२३ व्या दिवशी तब्बल ४० कोटींचा प्रवासी टप्पा पार केला आहे.
मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणा-या मुंबई मेट्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गत वर्षीच्या काळात यंदा मेट्रो प्रवाशांमध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अंधेरी-पश्चिम द्रुतगती महामार्ग या मेट्रो टप्प्यात मार्च २०१७ मध्ये १ लाख ६३ हजार ७८३ प्रवाशांनी प्रवास केला. यंदा यात ४८ टक्के वाढ होऊन मार्च २०१८ मध्ये तब्बल २ लाख ४२ हजार ५८३ पर्यंत हा आकडा पोहचला. घाटकोपर ते चकाला दरम्यान सर्वाधिक कमी अर्थात १३ टक्के वाढ झालेली आहे. या मार्गा दरम्यान मार्च २०१७ रोजी ४ लाख ९६ हजार ४४७ प्रवाशांनी प्रवासी केला तर मार्च २०१८ मध्ये ५ लाख ६० हजार ३८१ प्रवाशांनी मेट्रोच्या गारेगार प्रवासाचा लाभ घेतला.
मेट्रो गर्दीच्या वेळेत सुमारे एका फेरीमध्ये सुमारे २९ हजार प्रवाशांची वाहतूक करते. मुंबई मेट्रोला पहिल्या १० कोटी प्रवाशांचा टप्पा ३९८ दिवसांत पूर्ण केला होता. तर त्यापुढील १० कोटींसाठी ३८८ दिवस आणि तिसºया १० कोटींसाठी ३३७ आणि चौथ्या १० कोटी प्रवाशांसाठी ३०० दिवस लागल्याची माहिती मुंबई मेट्रोने दिली.
...........................................
(आकडे लाखांमध्ये)
मार्ग मार्च १८ मार्च १७ वाढ
अंधेरी-पश्चिम द्रुतगती मार्ग २.४२ १.६३ ०.७८
अंधेरी-आझाद नगर २.०४ १.४० ०.६३
अंधेरी-डीएननगर २.४३ २.०० ०.४२
अंधेरी-साकीनाका १०.६० ८.८३ १.७६
अंधेरी- एअरपोर्ट रोड १.९८ १.६७ ०.३१
अंधेरी-वर्सोवा २.८३ २.४१ ०.४१
अंधेरी-असल्फा ३.७१ ३.१७ ०.५४
अंधेरी-मरोळ नाका ६.८५ ५.९९ ०.८६
घाटकोपर-अंधेरी १०.४९ ९.२९ १.१९
घाटकोपर-चकाला ५.६० ४.९६ ०.६३