मुंबई मेट्रोचे आता नवे अॅप
By admin | Published: October 16, 2015 03:08 AM2015-10-16T03:08:41+5:302015-10-16T03:08:41+5:30
एखादा तांत्रिक बिघाड होऊन मेट्रोच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यास त्याची माहिती मुंबई मेट्रो वनच्या नव्या अॅपमध्ये मिळणार आहे
स्मार्ट कार्ड रिचार्ज होणार
मुंबई : एखादा तांत्रिक बिघाड होऊन मेट्रोच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यास त्याची माहिती
मुंबई मेट्रो वनच्या नव्या अॅपमध्ये मिळणार आहे. मेट्रोकडून प्रवाशांच्या सोयीसाठी अॅपचे अनावरण करण्यात आले. त्यात
ही माहिती प्रवाशांसाठी देण्यात येणार आहे.
एम-इंडिकेटरमध्येही अशी सेवा देण्यात आली असून रेल्वेकडून मात्र अशा प्रकारची कोणतीही सुविधा निर्माण करण्यात आलेली नाही. एखादा बिघाड झाल्यास त्याची माहीती उद्घोषणेव्दारे देण्याचे नियोजन आहे, तर मध्य रेल्वेने एखादी तांत्रिक समस्या उद्भल्यास लोकलमध्ये त्याची माहीती घोषणेव्दारेच देण्याची सोय केली आहे.
मुंबई मेट्रोच्या नव्या अॅपमध्ये वाहतूक नियोजन, स्मार्ट कार्ड रिचार्जसह अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत. हे अॅप गुगल प्ले स्टॉअरवर उपलब्ध असेल, अशी माहिती मेट्रोच्या प्रवक्ताकडून देण्यात आली. या अॅपमध्ये रिचार्ज करण्याबरोबरच बॅलन्स, स्मार्ट कार्डवर केलेले शेवटचे दहा प्रवास, नातेवाईक आणि मित्रांचे स्मार्ट कार्ड रिचार्ज करण्याची सुविधाही असल्याचे सांगण्यात आले. हे अॅप गुगल प्ले स्टोअरमध्ये ‘मुंबई मेट्रो १’नावाने असेल.