मुंबई : घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या मार्गावर धावणा-या मुंबईमेट्रो वनने लॉकडाऊननंतर १९ ऑक्टोबर रोजी पुन्हा सेवा सुरू केली असून, आता मेट्रोने प्रवास करत असलेल्या प्रवाशांची संख्या देखील वाढू लागली आहे. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने सोमवारपासून मुंबई मेट्रो आपलया प्रवासाच्या वेळेतही वाढ करत आहे.
मुंबई मेट्रोची सेवा सर्वांसाठी खुली असून, प्रवाशांचा आकडा ५० हजारांच्या घरात गेला आहे. परिणामी सोमवारपासून मुंबई मेट्रो वन प्रवाशांच्या सोयीसाठी ऑपरेटिंग वेळ वाढवत आहे. त्यानुसार आता वर्सोवाहून पहिली रेल्वे सकाळी ७.५० वाजता सुटेल. तर घाटकोपर येथून सकाळी ८.१५ वाजता सुटेल. त्याचप्रमाणे घाटकोपर येथून शेवटची ट्रेन रात्री ९.१५ आणि वर्सोवा येथून रात्री ८.३० वाजता सुटेल. पूर्वीच्या सेवा सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ या वेळेत होत्या. रेल्वे सुटणयाच्या आधी स्थानके १५ मिनिटांपूर्वी उघडली जातील.