प्रगतीपथावर... संततधार पावसातही मुंबई मेट्रोची कामे अविरत चालू

By सचिन लुंगसे | Published: July 27, 2023 11:36 AM2023-07-27T11:36:02+5:302023-07-27T11:36:45+5:30

मेट्रो २ब च्या पियर कॅप ची उभारणी ५४ टक्के पूर्ण, मुंबई मेट्रो मार्ग २ब ची ५१.६३ टक्के भौतिक प्रगती पूर्ण

Mumbai Metro works continue continuously despite heavy rains | प्रगतीपथावर... संततधार पावसातही मुंबई मेट्रोची कामे अविरत चालू

प्रगतीपथावर... संततधार पावसातही मुंबई मेट्रोची कामे अविरत चालू

googlenewsNext

मुंबई : डी एन नगर ते मंडाळे दरम्यान प्रगतीपथावर असलेल्या मेट्रो मार्ग २ ब च्या पियर्स आणि पियर कॅपची उभारणी सुरू आहे. रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू असून देखील एमएमआरडीएच्या मेट्रो टीम ने चेंबूर येथील मुंबई मेट्रो मार्ग २ब च्या पॅकेज सी १०२ मध्ये पिअर कॅपची उभारणी पूर्ण केली आहे. या मर्गिकेची कामे ३ पॅकेज मध्ये सुरू आहे.

जून आणि जुलै या मान्सूनच्या महिन्यात ३३ पियर्स तसेच २३ पियर कॅप्स ची उभारणी करण्यात टीम ला यश आले असून आत्तापर्यंत ८३९ पैकी ४५० पियर कॅप्स ची उभारणी पूर्ण झाली आहे. सध्यस्थितीतमेट्रो मार्ग २ ब ची ५१.६३ टक्के भौतिक प्रगती पूर्ण झाली असून सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. सारी मुंबई थकून शांतपणे विसावत असते तेव्हा मुंबईतील मेट्रोची टीम आपले काम अविरत आणि शांतपणे करते. 

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागामार्फत काही ठिकाणी रेड तसेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईची दळण वळण व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने आणि मुंबईकरांच्या त्रासमुक्त प्रवासासाठी प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेल्या मुंबई मेट्रो प्रकल्पांची कामे मुसळधार पावसातही अविरत सुरू आहेत. मेट्रोची कामे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊनये या साठी  प्रामुख्याने रात्रीच्या वेळी केली जातात. ज्यावेळेस मुंबई थांबलेली असते त्यावेळेस मेट्रोची टीम ही मुंबईकरांच्या उज्वल भविष्यासाठी कार्यरत असते. 

मुसळधार पावसा सारख्या आव्हानात्मक हवामानात ही, मेट्रोची टीम मेट्रोची सर्व कामे उल्लेखनीय वेगाने करत आहे. ट्रॅफिक समस्यांचे निराकरण करताना पायलिंग, पाइल कॅप, खांबाचे काँक्रीटीरण आणि पिअर कॅपच्या कामांदरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करून ही कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी एमएमआरडीए  वचनबद्ध आहे, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी यांनी सांगितले.

Web Title: Mumbai Metro works continue continuously despite heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.