मुंबई महानगरातील गृहविक्रीत ४५ टक्के घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:07 AM2020-12-22T04:07:49+5:302020-12-22T04:07:49+5:30
सर्वाधिक फटका दिल्लीला : गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांची विक्री ५१ टक्क्यांनी कमी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या तीन ...
सर्वाधिक फटका दिल्लीला : गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांची विक्री ५१ टक्क्यांनी कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई महानगरातील गृहविक्रीचे आकडे विक्रमी उच्चांक प्रस्थापित करताना दिसत असले, तरी वर्षाअखेरीस २०१९च्या तुलनेत घरांची विक्री तब्बल ४५ टक्क्यांनी कमी असेल. गेल्या वर्षी मुंबईत ८० हजार ८७० घरे विकली गेली होती. यंदा तो आकडा जेमतेम ४४ हजार ३२० पर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. देशातील प्रमुख सात महानगरांमध्येही घरांची विक्री ४७ टक्क्यांनी घटल्याची माहिती हाती आली आहे.
मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या सात प्रमुख शहरांमध्ये गेल्या दोन वर्षांत झालेल्या घरांच्या खरेदी-विक्रीचा आलेख ॲनराॅक प्राॅपर्टीज या सल्लागार संस्थेने मांडला. त्यातून ही माहिती समाेर आली. यंदा या सात शहरांमध्ये १ लाख ३८ हजार घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी तो आकडा २ लाख ६१ हजार होता. सर्वाधिक फटका दिल्ली शहराला बसला. तिथल्या गृहविक्रीत ५१ टक्क्यांची घट झाली. सर्वाधिक विक्री अपेक्षेप्रमाणे मुंबई महानगरात झाली. एकूण विक्रीपैकी ४४,३२० घरे मुंबईतील आहे, तर पुण्यातील गृहविक्रीचा आकडा २३,४६० इतका आहे.
* नव्या गृहनिर्माण प्रकल्पांनाही घरघर
कोरोना संक्रमणामुळे यंदा नव्या गृहनिर्माण प्रकल्पांनाही घरघर लागली. मुंबईतील गृहनिर्माणात सर्वाधिक घट झाली. गतवर्षी ७७,९९० नव्या घरांची बांधकामे सुरू करणाऱ्या या शहराने यंदा ३० हजार ९२० घरांच पाया रचला. हैदराबाद शहरात मात्र नव्या घरांची निर्मिती ४२ टक्क्यांनी वाढली.
* शेवटच्या तिमाहीत चांगली कामगिरी
गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत ५९,१६० घरे विकली गेली. यंदा या तिमाहीतील संख्या ५०,९०० आहे. यातील तब्बल ५३ टक्के घरे मुंबई-पुण्यातील आहेत. महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते.
विक्री झालेली घरेनव्याने बांधली जाणारी घरे
२०१९ २०२० २०१९ २०२०
मुंबई ८०,८७०४४,३२०७७,९९०३०,९२०
पुणे४०,९७०२३,४६०४६,४१०२३,९२०
दिल्ली४६,९२०२३,२१०३५,२८०१८,३५०
बंगळुरू ५०,४५०२४,९१०३९,९३०२१,४२०
हैदराबाद १६,५९०८,५६०१४,८४०२१,११०
चेन्नई११,८२०६,७४०१३,०००९,१७०
कोलकाता १३,९३०७,१५०९,४२०३,५३०
एकूण २,६१,३७०१,३८,३५०२,३६,५७०१,२७,९७०
............................