मुंबई इन मिनिट्स : मेट्रो रेक दाखल; लवकरच प्रवास सुखकर होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 03:45 PM2021-07-24T15:45:16+5:302021-07-24T15:46:43+5:30

पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ च्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. मेट्रोच्या या संचाची पुढील दोन महिन्यांसाठी कसोटी तपासणी केली जाणार.

Mumbai in minutes Metro rake came in kandivali charkop The journey is likely to be pleasant soon | मुंबई इन मिनिट्स : मेट्रो रेक दाखल; लवकरच प्रवास सुखकर होण्याची शक्यता

मुंबई इन मिनिट्स : मेट्रो रेक दाखल; लवकरच प्रवास सुखकर होण्याची शक्यता

Next
ठळक मुद्देपश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ च्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.मेट्रोच्या या संचाची पुढील दोन महिन्यांसाठी कसोटी तपासणी केली जाणार.

मुंबई : पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ च्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. कारण या दोन्ही मेट्रो मार्गावर चाचणीसाठीचा रेलिंग स्टॉक्सचा एक नवा रेक चारकोपच्या मेट्रो डेपोमध्ये दाखल झाला आहे. मेट्रोच्या या संचाची पुढील दोन महिन्यांसाठी कसोटी तपासणी केली जाणार असून, या चाचणीमुळे पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रोसाठीचा कालावधी आणखी जवळ येणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चारकोप डेपोमध्ये भारतीय बनावटीचे एकूण सहा मेट्रो कोच दाखल झाले आहेत. सर्व सुरक्षा चाचण्या पुर्ण केल्यावर मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ वर सुरु असलेल्या चाचणी धावण्यांमध्ये नुकतेच दाखल झालेल्या मेट्रो रेकचा समावेश केला जाईल. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ येत्या काही दिवसांत प्रवाशांना घेऊन धावणार असून, या दोन्ही मेट्रो रेल्वेचे तिकिट सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणारे असेल; असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला असून, सहा डब्यांच्या ट्रेनकरिता प्रवासी भाडे दराचा विचार करत हे भाडे कमीत कमी १० रुपये तर जास्तीत जास्त ८० रुपये असणार आहे.

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ दोन टप्प्यांत सुरु होतील. डहाणूकर वाडी ते आरे हा सुमारे २० किमी लांबीचा पहिला टप्पा सप्टेंबर २०२१ मध्ये तर उर्वरित संपुर्ण मार्ग जानेवारी २०२२ मध्ये प्रवाशांकरिता सुरु होईल. मुंबईत सप्टेंबर २०२१ पर्यंत १० मेट्रो ट्रेन दाखल होतील. बीईएमएल, बंगळुरु  हे हिटाची, जपान यांच्या तांत्रिक सहकार्याने प्रथमच मेट्रोचे सेट तयार करत् आहे. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही प्रकल्पातून दररोज सुमारे ९ लाख प्रवासी प्रवास करतील. तर मेट्रोच्या प्रत्येक ट्रेनमध्ये सहा पैकी एक डबा महिलांसाठी राखीव असणार आहे. या व्यतीरिक्त प्रत्येक डब्यात चार जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.

१३ लाख प्रवाशांना सेवा
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ सुरु झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर पट्टयातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. चालकविरहीत ट्रेनशी अनुकूलता, ऊर्जा वाचविणारी पुनरुत्पादक ब्रेक सिस्टम, प्रत्येक बाजूला चार दरवाजांची स्टेनलेस स्टील बॉडी आणि प्रवाशांना सायकलसह प्रवास करता येऊ शकेल, असे मेट्रोचे फायदे आहेत.  

वेळ वाचणार
वेळ वाचणार आहे. प्रदूषण होणार नाही. ३० ते ३५ टक्के रस्ते प्रवासी वाहतूक मेट्रोमध्ये स्थलांतरित होईल. उपनगरीय रेल्वे सेवेवरील ताण १२ व्यक्ती/चौरस मीटरहून ७ व्यक्ती/चौरस मीटर कमी होइल. प्रत्येक मार्गाद्वारे ३० ते ४० मिनिताने प्रवास वेळेत बचत होईल. सर्व मेट्रो मार्ग सुरु झाल्यानंतर दरवर्षी सुमारे २ लाख ५० हजार टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होईल.

अशी जोडणार मुंबई
मेट्रो २ अ दहिसर पूर्व ते डि.एन. नगर असा आहे. दहिसर येथे मार्ग ७, शास्त्री नगर येथे ६, डी.एन. नगर येथे मार्ग ७ सोबत जोडला जाईल. मेट्रो ७ अंधेरी पूर्व ते दहिसर पूर हा पश्चिम द्रुतगती मार्गाच्या बाजुने जाईल. हा मार्ग अंधेरी येथे मार्ग १, जोगेश्वरी जेव्हीएलआ येथे मार्ग ६ आणि दहिसर येथे मार्ग २ अ सोबत जोडला जाईल.ॉ

भाडं किती ?

  • ०-३ किमी : १० रुपये
  • ३-१२ किमी : २० रुपये
  • १२-१८ किमी : ३० रुपये
  • १८-२४ किमी : ४० रुपये
  • २४-३० किमी : ५० रुपये
  • ३०-३६ किमी : ६० रुपये
  • ३६-४२ किमी : ७० रुपये
  • ४२ किमी : ८० रुपये


ठळक वैशिष्ट्ये

  • मेट्रो २ अ
  • कॉरिडोर - दहिसर पूर्व ते डी एन नगर
  • लांबी - १८.६ कि.मी
  • आगार - चारकोप
     

एकूण स्थानके - अंधेरी (पश्चिम), लोअर ओशिवरा, ओशिवरा, गोरेगाव (पश्चिम), पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड (पश्चिम), वळनाई, डहाणूकर वाडी, कांदिवली (पश्चिम), पहाडी एकसर, बोरिवली (पश्चिम), एकसर, मंडपेश्वर, कंदरपाडा, अप्पर दहिसर आणि दहिसर (पूर्व))

  • मेट्रो ७
  • कॉरिडोर - अंधेरी ते दहिसर
  • लांबी - १५.५ कि.मी
  • आगार - चारकोप
     

एकूण स्थानके - गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी (पूर्व), गोरेगाव (पूर्व), आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागठाणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्योग आणि ओवरीपाडा

३ हजार कोटींचा खर्च
मेट्रोच्या प्रत्येक कोचसाठी ८ कोटी खर्च होत आहेत. ३७८ कोच टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होतील. कोचच्या निर्मितीसाठी एकूण ३ हजार १५ कोटी खर्च येत आहे.  एकूण कोचची संख्या ५७६ पर्यंत वाढणार आहे. 

  • प्रत्येक कोचसाठी ८ कोटी खर्च 
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर कोचच्या निर्मितीसाठी सरासरी १० कोटी खर्च
  • ३७८ कोच टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होतील
  • प्रत्येक ट्रेन ६ कोचची
  • प्रत्येक कोचमध्ये ५२ प्रवाशांची आणि ३२८ प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था
  • एका डब्यात ३८० जणांचा प्रवास शक्य
  • एका ट्रेनची प्रवासी क्षमता २२८०

Web Title: Mumbai in minutes Metro rake came in kandivali charkop The journey is likely to be pleasant soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.