मुंबई इन मिनिट्स : मेट्रोसाठी शंटिंग ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 05:37 PM2020-12-05T17:37:52+5:302020-12-05T17:38:35+5:30
Shunting operation for Metro : रोड-रेल शंटर लोको आणि मूव्हरचे उद्घाटन
मुंबई : चारकोप मेट्रो डेपोसाठीच्या नवीन रोड-रेल शंटर लोको आणि मूव्हरचे उद्घाटन एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए.राजीव यांनी शनिवारी केले. इलेक्ट्रिकल आणि नॉन-इलेक्ट्रिकल साधने ही नॉन-पॉवर्ड मेट्रो कार गाड्यांसाठी शंटिंग ऑपरेशन करतील. रोड कम-रेल-मूवर (आरएमएम) आणि डिझेल शंटिंग लोको हे चारकोप मेट्रो डेपो कार्यशाळेत इलेक्ट्रिक मेट्रो ट्रेनच्या देखभालीच्या अविभाज्य हेतूसाठी ८ कार ट्रेन सेट खेचण्यास सक्षम असेल.
चारकोप मेट्रो डेपो येथे ही लोकटोमोटिव्ह सुरू करणारी आदिश्री ठाकरे ही पहिली ट्रेन ऑपरेटर आहे. आरएमएम आणि रोड-कम-रेल डिझेल शंटिंग लोको हे विविध वैशिष्ट्ये आणि प्रगत सुरक्षा उपायांनी सुसज्ज आहेत. महत्त्वपूर्ण अशा देखभाल कामासाठी तसेच मेट्रो गाड्यांची कामगिरी टिकवून ठेवण्यासाठी याची मदत होईल. यातून सुरक्षित आणि सुलभ प्रवास निश्चित होण्याबरोबरच एमएमआरडीएचेमुंबई इन मिनिट्स हे ध्येय साध्य करण्यास मदत होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.
रेल कम रोड मुव्हर हे बॅटरीचलित आहे. स्वंतत्र कारचे शटिंग ऑपरेशन म्हणजे बाजुच्या रुळावर नेण्याची प्रक्रिया करण्यास सक्षम आहे. याची किंमत १७७.२६३ हजार युरो आहे. तर रोड कम रेल डिझेल शंटिंग लोकोद्वारे ट्रेनचे सेट, वैयक्तिक कारची विदुतविहीन अवस्थेत हालचाल करणे किंवा त्याला वाहून नेणे शक्य होईल. यांची किंमत ६८१.०९ हजार युरो आहे. हे रेल्वे तसेच रोडवर काम करू शकते.