Join us

मनसैनिकांनी उधळून लावली काँग्रेसच्या संजय निरुपम यांची सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 4:19 PM

फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून आमनेसामने आलेल्या काँग्रेस व मनसेमध्ये वाद सुरूच आहेत. शनिवारीदेखील (25 नोव्हेंबर ) मनसेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांची सभा उधळून लावली.

मुंबई - फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून आमनेसामने आलेल्या काँग्रेसमनसेमध्ये वाद सुरूच आहेत. शनिवारीदेखील (25 नोव्हेंबर ) मनसेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांची सभा उधळून लावली. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी या प्रकरणी काही मनसैनिकांना ताब्यात घेतले. घाटकोपरच्या संजय गांधी नगरातील नालाबाधित झोपडीवासीयांना मार्गदर्शन करण्यासाठी निरुपम यांनी सभा आयोजित केली होती. निरुपम हे सभेच्या ठिकाणी येताच मनसेचे काही कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी आले व त्यांनी घोषणाबाजी करत सभा उधळवून लावण्यास सुरुवात केली.

काही मनसैनिकांनी खुर्च्या उचलून फेकल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली व मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांना चिथावल्यामुळं मनसेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला झाला होता. मनसैनिकांच्या मनात हाच राग आहे. तोच या निमित्तानं बाहेर पडला आहे,' असं मनसेच्या संदीप देशपांडे यांनी सांगितलं.

ठाण्यात मनसेचा राडा, परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मारहाणठाणे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त केल्यानंतर आता ठाणे शहर मनसेने शहरातील परप्रांतीय मासे विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी (24 नोव्हेंबर)सकाळी शहरातील विविध भागात मासे विक्रीचा व्यवसाय करणा-या परप्रांतियांना मनसे स्टाईलने बेदम चोप दिला. मासे विक्री करणाऱ्या आगरी कोळी बांधवांना परप्रांतिय मासे विक्री करणाऱ्यामुळे त्रास होत असल्याची आणि त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार मनसेकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार शुक्रवारी शहराच्या विविध भागात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून परप्रांतिय मासे विक्री करणा-यांना मनसे स्टाईलने चोप देण्यात आला. कोलबाड भागातील आगरी कोळी समाजातील मासे विक्रेत्यांना या परप्रांतिय मासे विक्री करणा-यांचा त्रास होत होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून या मासे विक्री करणाऱ्याना येथून पिटाळू लावण्यात आले आहे.

कोलबाड परिसरातील रस्त्यांवर अनेक मच्छी विक्रेते बसतात. एक रांगेत जवळपास 20 ते 25 मच्छी विक्रेते बसतात. यातील बहुतेक मच्छी विक्रेते हे परप्रांतीय आहेत, असा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. ठाणे आणि कोलबाड परिसरातील स्थानिक कोळी समाज आहे, त्यांना या ठिकाणी मच्छी विकण्यास बसण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी मनसेची आहे.  एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिला होता. त्यानंतर मनसैनिकांनी ठिकठिकाणी आपल्या स्टाइलनं आंदोलन केलं.  रेल्वे स्टेशनांच्या आसपास 150 मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिल्यामुळे मनसेला नवं बळच मिळालं आहे.  

टॅग्स :मनसेसंजय निरुपमकाँग्रेसराज ठाकरे