मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले असून, आता उत्तरोत्तर याचा फायदा चांगला फायदा दिसून येत आहे. विशेषत: मुंबईच्या हवेतील प्रदूषणाचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून, मुंबईची हवा समाधानकारक नोंदविण्यात येत आहे. आणि यातही सकारात्मक बाब म्हणून या निमित्ताने मुंबईकरांना निसर्ग न्याहळता येत आहेत. निसर्गाची विविध रुपे त्यांना दिसून येत आहेत. याचे नुकतेच समोर आलेले उदाहरण म्हणजे बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हरणांचे कळप मुक्त विहार करताना आढळून येत आहेत. तर बाणगंगा येथे चक्क रस्त्यांवर मोर निदर्शनास आल्याचे मुंबईकरांनी नमुद केले आहे.
निसर्गमित्र सुनीश कुंजू यांनी सांगितले की, लॉक डाऊननंतर बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बंद करण्यात आले आहे. येथे आता पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. परिणामी आत असलेले हरणांचे कळप मुक्त विहार करताना आढळत आहेत. दुसरीकडे बाणगंगा येथेदेखील रस्त्यांवर मोर निदर्शनास आले आहेत. येथे मानवाचा संचार कमी झाल्याने पक्षी आणि प्राण्यांचा संचार वाढला आहे. आवाज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुलअली यांनीदेखील वांद्रे येथील पक्षी नोंदी समाजमाध्यमांवर नोंदविल्या होत्या. मुंबईकरांची सकाळ पक्ष्यांच्या किलबिलाटाने होत असल्याने सुमेरा यांनी नमुद केले होते. केवळ सुनीश आणि सुमेरा नव्हे तर मराठी विज्ञान परिषदेनेदेखील निसर्गाचा अ•यास करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
दरम्यान, कोरोनाला थोपविण्यासाठी देश•ारात लॉक डाऊन करण्यात आले आहे. जो तो आपआपल्या परीने स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच लॉक डाऊनच्या काळात सर्व काही बंद असताना निसर्गाचे चक्र सुरू आहे. परिणामी याच निसर्गातले काही क्षण; जे तुम्हाला घरी बसून टिपता येतील, ते टिपा आणि आमच्याकडे पाठवा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेने केले आहे. आता ३-४ आठवड्याच्या या लॉक डाऊनच्या काळात पक्षी, प्राणी, वनस्पती, झाडे यांच्यावर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठीची ही एकमेव दुर्मिळ संधी आहे. यासाठी घराबाहेर पडू नका. सरकारी आदेश मोडला जाईल आणि आपल्यालाच धोका निर्माण होईल, असे काही करू नका. पण घरात बसून, खिडकीतून डोकावून, घराच्या गच्चीवर जाउन, बाल्कनीतून अनेक प्रकारची निरीक्षणे करता येतील. यातून पर्यावरणाच्या संदर्•ाात आपल्याला काही शिकायला मिळेल, असे परिषदेने म्हटले आहे.