मुंबई महापालिकेने फुंकले रणशिंग!

By admin | Published: October 6, 2015 05:01 AM2015-10-06T05:01:49+5:302015-10-06T05:01:49+5:30

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने सोमवारी रणशिंग फुंकले आहे. मतदानापूर्वी मतदारांना नाव नोंदविण्यासह नाव काढण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी

Mumbai municipal blew the trumpet! | मुंबई महापालिकेने फुंकले रणशिंग!

मुंबई महापालिकेने फुंकले रणशिंग!

Next

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने सोमवारी रणशिंग फुंकले आहे. मतदानापूर्वी मतदारांना नाव नोंदविण्यासह नाव काढण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनातर्फे मतदार नोंदणी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेची औपचारिक घोषणा अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली आहे. प्रभागांच्या पुनर्रचनेबाबत मात्र अद्याप काहीच हालचाली झालेल्या नाहीत. असे असले तरी प्रभागांची पुनर्रचना होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी महापालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरणाऱ्या संभाव्य उमेदवारांकडून आपले सर्वस्व पणाला लावण्यासाठीच्या हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत.
मुंबई महापालिका प्रशासनाकडून सार्वत्रिक निवडणूक-२०१७ च्या अनुषंगाने मतदार नोंदणी जनजागृती मोहीम ८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाला मुंबईकरांचा अधिकाधिक प्रतिसाद मिळावा म्हणून विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पत्रे पाठविण्यात आली आहेत. शिवाय स्वयंसेवी संस्थांच्या बैठकाही आयोजित करण्यात येत आहेत. याकामी अडचणी येणाऱ्या स्वयंसेवकांना याबाबत मार्गदर्शन करत समस्या सोडविण्यावर भर दिला जात आहे.
महापालिका निवडणुकीसाठी मतदारांना नाव नोंदवता यावे म्हणून विविध माध्यमांतून प्रचार आणि प्रसिद्धी केली जाणार आहे. या अभियानांतर्गत वृत्तपत्र जाहिरात, बेस्ट बस, आकाशवाणी, विभाग कार्यालयात जाहिरात फलक, दूरदर्शन व खासगी चित्रवाहिन्या, लोकल टे्रनवर बाहेरून संपूर्ण जाहिरात, फ्लेक्स, बॅनर्स सिनेमागृहात प्रदर्शित करणे, लोकल केबल नेटवर्कद्वारे या विविध माध्यमातून मोहीम राबवण्यात येणार आहे. जेणेकरून नागरिकांचा या अभियानाला भरघोस पाठिंबा मिळू शकेल, असे महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)

‘प्रभागांच्या पुनर्रचनेच्या हालचाली
अद्याप नाहीत’
लोकसंख्येनुसार ब्लॉक फिक्सेशनचे काम हाती घेण्यात आले आहे. तरीही प्रभागांच्या पुनर्रचनेबाबत अद्याप मात्र काहीच हालचाली झालेल्या नाहीत.
मुंबईतील २२७ प्रभागांची तरतूद कायद्यामध्ये आहे आणि लोकसंख्येनुसार मतदारांची संख्या लक्षात आली तर प्रभाग विभागात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रभागांची पुनर्रचना कायदेशीर मार्गाशिवाय होणार नाही.
या प्रकरणी निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम राहील. परिणामी प्रभागांच्या पुनर्रचनेबाबत सध्या तरी काहीच स्पष्ट करता येणार नाही, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

01/01/2016
रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींना आपापली नावे मतदार यादीत समाविष्ट करता येणार आहेत. शिवाय दुबार, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची सुविधाही मिळणार आहे.

1000
बुथ
2150
कर्मचारी
गरज भासल्यास
2100
अतिरिक्त कर्मचारी
70
लाखांची तरतूद

नाव, पत्ता बदलण्याची व्यवस्था पुराव्यांची अट कायम
बँक पासबुक, किसान कार्ड, रेशनकार्ड, वाहनचालक परवाना, जलबिल, वीजबिल, गॅस जोडणी इत्यादी पुराव्यांची खातरजमा

१४ आॅक्टोबर रोजी प्रत्येक वॉर्डात इलेक्ट्रोरोलचे वाचन
दावे निकाली काढण्याची शेवटची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर
मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी प्रत्येकाची
अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला

Web Title: Mumbai municipal blew the trumpet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.