कोस्टल रोडचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 03:45 AM2019-12-31T03:45:35+5:302019-12-31T06:48:56+5:30

वरळी, अमरसन्स येथे काम सुरू; ट्रक-डंपर वाहतुकीला जादा वेळ मिळवण्याचा प्रयत्न

Mumbai Municipal Corporation to accelerate Coastal Road | कोस्टल रोडचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेची धावपळ

कोस्टल रोडचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेची धावपळ

Next

मुंबई : महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर महापालिकेचे काम वेगाने सुरू झाले आहे. मात्र यावर वेळेचे बंधन असल्याने सध्या ट्रक-डंपर वाहतुकीसाठी असणारी रात्री १२ ते स. ६ पर्यंतची वेळ आहे. ही वेळ वाढवून मिळावी यासाठी पालिकेची धावपळ सुरू आहे.

कोस्टल रोड प्रकल्पावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने १७ डिसेंबर रोजी उठवली. तब्बल सहा महिने समुद्रमार्गाचे काम रखडल्याने त्याचा परिणाम या प्रकल्पाच्या डेडलाईनवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन विघ्न उभे राहण्यापूर्वी प्रकल्पाचे जास्तीत जास्त काम करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. सध्या वरळी आणि अमरसन्स या ठिकाणी काम सुरू आहे.

मात्र या कामासाठी लागणाऱ्या मोठ्या मशिन्स आणि इतर मोठी यंत्रे आणण्यासाठी ट्रक-डंपरची वाहतूक करण्यास वाहतूक विभागाने रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंतचीच परवानगी दिली आहे. यामुळे कोस्टल रोडच्या कामात विलंब होत असल्याने ही वेळ वाढवून देण्याची मागणी आरटीओकडे करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

‘मेट्रो प्रकल्पाप्रमाणे वेळ द्यावा’
१२ ऑक्टोबर २०१८मध्ये या कामाला सुरुवात झाली असून, १३ ऑक्टोबर २०२२पर्यंत म्हणजेच चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे १५४ दिवसांचा कालावधी स्थगितीमध्ये गेला आहे. त्यामुळे आरटीओने ट्रक-डंपर वाहतुकीचा वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी पालिकेने केली आहे. यासाठी मेट्रोच्या कामाचा दाखला देण्यात येत आहे. मेट्रो-३चे काम अनेक ठिकाणी दिवसरात्र सुरू असते. याच धर्तीवर कोस्टल रोडच्या कामासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र आरटीओला देण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडीतून होणार सुटका
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात प्रिंन्सेस स्ट्रिट ते वरळी सी लिंकपर्यंतचा ९.९८ कि.मी.चा कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे.
कोस्टल रोडमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून, वेळेची बचत - ७० टक्के होईल, तर प्रतिवर्षी इंधनाची बचत ३४ टक्के होईल.
टोलमुक्त आणि विनाअडथळा प्रवासासह ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Mumbai Municipal Corporation to accelerate Coastal Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.