नवरात्रोत्सव, छटपूजेसाठी सर्व व्यवस्था मुंबई महानगरपालिका करणार! बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 04:55 PM2023-10-11T16:55:49+5:302023-10-11T16:57:14+5:30

मुंबईत दरवर्षी १२०० हून अधिक ठिकाणी नवरात्रोत्सव तर ८२ हून अधिक ठिकाणी छटपूजेचे आयोजन

Mumbai Municipal Corporation BMC will make all arrangements for Navratri Festival, Chhat Puja! | नवरात्रोत्सव, छटपूजेसाठी सर्व व्यवस्था मुंबई महानगरपालिका करणार! बैठकीत निर्णय

नवरात्रोत्सव, छटपूजेसाठी सर्व व्यवस्था मुंबई महानगरपालिका करणार! बैठकीत निर्णय

Mumbai BMC at Navratri Chhat Puja: एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस-अजित पवार महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबईत पहिल्यांदाच नवरात्रोत्सव आणि छटपूजा होणार आहे. त्यामुळे सरकारच्या निर्देशानुसार मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष  शेलार यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ यांची संयुक्त बैठक आज दुपारी झाली. महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत या दोन्ही उत्सवांचे संपूर्ण नियोजन महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने करावे असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

बैठकीत झालेल्या निर्णयापैकी ठळक मुद्दे-

  • नवरात्रोत्सावासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या गणेश उत्सवाच्या धर्तीवरच एक खिडकी (One Window) योजनेमार्फत देण्यात येतील.
  • बिगर व्यावसायिक नवरात्री मंडळासाठी परवानगी शुल्क, अग्निशमन शुल्क माफ केले जाईल. नाममात्र अनामत रक्कम रु. १००/- आकारण्यात येईल.
  • नवरात्रीत दसऱ्याला दुर्गा मूर्ती विसर्जन, गरबा विसर्जन यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था, प्रकाशझोत दिवे, शौचालय, धुम्र फवारणी, स्वच्छता, निर्माल्य कलश इ. व्यवस्था  गणेश विसर्जनाच्या धर्तीवर महापालिका प्रशासकीय विभागातर्फे उभारण्यात येईल. तसेच पोलीस प्रशासनाकडून महिलांच्या सुरक्षेची तसेच दागिन्यांच्या चोऱ्या होऊ नयेत म्हणून पुरेसा बंदोबस्त ठेऊन काळजी घेण्यात येईल. वाहतूक नियंत्रण व पार्किंग व्यवस्था याकडे विशेष लक्ष वाहतूक पोलीस देतील.
  • छटपूजेसाठी आवश्यक कृत्रिम तलावांची व्यवस्था, , प्रकाशझोत दिवे, शौचालय, धुम्र फवारणी, स्वच्छता, निर्माल्य कलश इ. व्यवस्था तसेच महिलांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष अशी सर्व  व्यवस्था प्रशासकीय विभागातर्फे करण्यात येईल.
  • छटपूजेसाठी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी  तसेच २० नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे सूर्योदयाच्यावेळी आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल.
  • नवरात्री, रास दांडिया, गरबा आयोजनाच्यावेळी महिला सुरक्षेसाठी महापालिका व पोलीस प्रशासन यांजकडून जनजागृती बॅनर्स लावण्यात येतील.


मुंबई शहरात १२०० हून अधिक नवरात्री मंडळे दरवर्षी अधिकृतरित्या परवानगी घेतात तसेच मुंबई शहरात ८२ हून अधिक ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले जाते. मुंबई शहराच्या १५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच हिंदू सणाबाबत तातडीने घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्व नवरात्रोत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ यांनी सरकारचे आभार मानले. बैठकीत मुंबई भाजपा उपाध्यक्ष पवन त्रिपाठी, माजी गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, कमलेश यादव, विद्यार्थी सिंह, शीतल गंभीर – देसाई, दक्षा पटेल, प्रियांका मोरे, हरिष भांदिर्गे, सेजल देसाई तसेच  मुंबई प्रवक्ता निरंजन शेट्टी आदी उपस्थित होते. 

Web Title: Mumbai Municipal Corporation BMC will make all arrangements for Navratri Festival, Chhat Puja!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.