जुन्या काळात कष्टकऱ्यांची मुंबई म्हणून ओळख असलेला परिसर. नोकरी - व्यवसायासाठी उपनगरातून नागरिक या ठिकाणी येतात. या ठिकाणी ८० टक्के जागा व्यावसायिकांनी, २० टक्के नागरी वस्ती असलेला परिसर म्हणजे सी वॉर्ड. १०० वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारती आहेत. मुंबईतील व्यवसायाचे प्रमुख केंद्र या वॉर्डामध्ये आहेत. शहरातील सर्वात जुनी आणि मोठ्या स्मशानभूमीपासून, पुरातन मंदिरे आणि सगळ्या पद्धतीचे बाजार याच वॉर्डामध्ये येतात. सकाळी सुरू झालेली गजबज रात्री उशिरापर्यंत कायम असते.
हद्द-पूर्व-पश्चिम :
पूर्व : इब्राहिम राहिमातुल्ला मार्ग, अब्दुल रहमान रोडपर्यंतपश्चिम : त्रिंबक परशुराम मार्ग, अरदेशीर दादी मार्ग, विठ्ठलभाई पटेल मार्ग व बाबासाहेब जयकर मार्गउत्तर : एम. एस. अली रोडदक्षिण : पाटण जैन मार्ग, एल. टी. मार्ग, आनंदीलाल पोतदार मार्ग.
वॉर्डाचे वैशिष्ट्य :
चंदनवाडी स्मशानभूमी, बडा कब्रस्थान, पारशी अग्यारी याचे वेगळेपण डोळ्यात भरणारे आहे. मुंबईतील पहिला मैलाचा दगड सी विभागात आहे. पारतंत्र्य काळात झालेल्या सर्व आंदोलनाचे सी विभागातील प्रत्येक गल्ली, रस्ते साक्षीदार आहेत.
१०० वर्षे जुने असलेले स्वदेशी मार्केट, मंगलदास मार्केट, एम. जे. मार्केट आजही जोमाने उभी आहेत. सर्वाधिक बाजारपेठ या विभागात असून त्यामध्ये नळ बाजार, प्रिन्सेस स्ट्रीट, तांबा काटा, झवेरी बाजार, भुलेश्ववर, काळबादेवी यांचा समावेश आहे.
महापालिका प्रभाग माजी नगरसेवक : अतुल शहा : वॉर्ड क्र. २२० आकाश पुरोहित : वॉर्ड क्र. २२१ रिटा मकवाना : वॉर्ड क्र. २२२
उद्धव चंदनशिवे - सहायक पालिका आयुक्त : या परिसरात अनेक इमारती या १०० वर्षांपेक्षा अधिक जुन्या आहेत. सदर इमारतीचा पुनर्विकास करणे गरजेचे आहे. खलप इमारती या दाटीवाटीने वसविल्या गेल्या आहेत. अनेक इमारतींचे बांधकाम पुरातन काळातील आहेत. जुन्या हाऊस, गल्ल्या आहेत. बहुतांश भाग हा व्यावसायिक असल्याने पार्किंगची मोठी समस्या या भागात आहे. नागरिकांच्या सहकार्याने परिसर स्वच्छ ठेवण्याचा महापालिकेच्या वतीने सातत्याने प्रयत्न केला जात आहे. वॉर्डात लोकांना वेळेवर नागरी सेवा देण्यासाठी सर्व अधिकारी काम करत असतात.
पर्यटनस्थळे : मुंबादेवी, काळबादेवी, गोल देऊळ, प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल, जुम्मा मशीद, दादीशेट आताश बहरम (ऐतिहासिक पारशी अग्यारी १७७१), मुंबई मैलाचा दगड -१, काळबादेवी मार्ग, सरदार गृह (लोकमान्य टिळकांचे निवासस्थान)
२ डिस्पेन्सरी रुग्णालये
१ महापालिका स्त्री रोग रुग्णालय