Join us

बनावट जातप्रमाणपत्र सादर करणाऱ्या नगरसेवकांना अभय, माहिती अधिकारात उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 4:04 AM

जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पद गेलेल्या नगरसेवकांवर आजतागायत महापालिकेने गुन्हा दाखल केलेला नाही. विशेष म्हणजे या यादीत मुंबईचे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचाही समावेश आहे.

मुंबई - जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पद गेलेल्या नगरसेवकांवर आजतागायत महापालिकेने गुन्हा दाखल केलेला नाही. विशेष म्हणजे या यादीत मुंबईचे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचाही समावेश आहे. माहितीच्या अधिकाराखाली ही धक्कादायक बाब उजेडात आली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका चिटणीस खात्याकडे गेल्या तीन पालिका निवडणुकांची माहिती मागितली होती. विधी खात्याचे उप कायदा अधिकारी अनंत काजरोलकर यांनी, कोणत्याही नगरसेवक किंवा नगरसेविकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे त्यांना कळविले. तर निवडणूक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २० नगरसेवकांचे पद खोट्या जातीमुळे तर एका नगरसेवकाचे पद दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यामुळे बाद झाले होते. या २१ नगरसेवकांमध्ये मुंबईचे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचेदेखील नाव आहे. याप्रकरणी गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त यांना पत्र पाठवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संबंधितांना भविष्यात निवडणूक लढविण्यास बंदी घातली तरच अशा प्रवृत्तींना आळा बसेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई