Mumbai: अनधिकृत कॅफे इराणी सूफीवर महापालिकेची तोड़क कारवाई

By मनोहर कुंभेजकर | Published: December 30, 2022 05:42 PM2022-12-30T17:42:47+5:302022-12-30T17:43:07+5:30

Mumbai:  या सगळ्या प्रकाराची दखल घेऊन पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी आज स्वतः 11.30 वाजता घटनासाठी पालिकेचा फोजफाटा आणि 50 कर्मचारी अशी यंत्रणा लावत येथील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या इराणी हॉटेलवर तोडक कारवाई केली.

Mumbai: Municipal Corporation crackdown on unauthorized Cafe Irani Sufi | Mumbai: अनधिकृत कॅफे इराणी सूफीवर महापालिकेची तोड़क कारवाई

Mumbai: अनधिकृत कॅफे इराणी सूफीवर महापालिकेची तोड़क कारवाई

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर
मुंबई - पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव पूर्व आरे चेक नाका नजीक असलेल्या  मोहन गोखले रोड व दूधसागर रोड़ च्या जंक्शन वर अनधिकृत पणे सुरू असलेल्या " सुफी इराणी कॅफे " मुळे मोठ्या प्रमाणात दुचाकी, रिक्षा तसेच चारचाकी वाहने चहापान तसेच धूम्रपान करण्यासाठी थांबत होती.दिवसभर याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात तसेच रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी समाजविघातक घटकांचा वावर असल्याचा त्रास समान्य नागरिकांना खूप त्रास  होत होता. याबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात आली होती.

 या सगळ्या प्रकाराची दखल घेऊन पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी आज स्वतः 11.30 वाजता घटनासाठी पालिकेचा फोजफाटा आणि 50 कर्मचारी अशी यंत्रणा लावत येथील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या इराणी हॉटेलवर तोडक कारवाई केली. याबाबत सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी सांगितले की,सदर जागा ही दुग्धविकास विभागाच्या अखयारीतीत आहे. जर पालिकेला ही जागा हस्तांतरीत येथील नागरिकांचे पुनर्वसन करून येथील रस्ता रुंदीकरण करण्यात येईल.

Web Title: Mumbai: Municipal Corporation crackdown on unauthorized Cafe Irani Sufi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई