- मनोहर कुंभेजकरमुंबई - पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव पूर्व आरे चेक नाका नजीक असलेल्या मोहन गोखले रोड व दूधसागर रोड़ च्या जंक्शन वर अनधिकृत पणे सुरू असलेल्या " सुफी इराणी कॅफे " मुळे मोठ्या प्रमाणात दुचाकी, रिक्षा तसेच चारचाकी वाहने चहापान तसेच धूम्रपान करण्यासाठी थांबत होती.दिवसभर याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात तसेच रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी समाजविघातक घटकांचा वावर असल्याचा त्रास समान्य नागरिकांना खूप त्रास होत होता. याबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात आली होती.
या सगळ्या प्रकाराची दखल घेऊन पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी आज स्वतः 11.30 वाजता घटनासाठी पालिकेचा फोजफाटा आणि 50 कर्मचारी अशी यंत्रणा लावत येथील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या इराणी हॉटेलवर तोडक कारवाई केली. याबाबत सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी सांगितले की,सदर जागा ही दुग्धविकास विभागाच्या अखयारीतीत आहे. जर पालिकेला ही जागा हस्तांतरीत येथील नागरिकांचे पुनर्वसन करून येथील रस्ता रुंदीकरण करण्यात येईल.