मुंबई महानगरपालिका ई वॉर्ड; ऐतिहासिक-सांस्कृतिक वैभव असलेला विभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 10:54 AM2024-01-05T10:54:26+5:302024-01-05T10:55:39+5:30
ऐतिहासिक-सांस्कृतिक आणि सामाजिक वैभव आहे.
या विभागातील माझगाव हे पूर्वीच्या मुंबईतील सात बेटांपैकी एक असून, याला ऐतिहासिक-सांस्कृतिक आणि सामाजिक वैभव आहे. एकीकडे मराठी जनांची चाळसंस्कृती, तर दुसरीकडे पारसी, ख्रिस्ती समुदायांच्या संस्कृतींचा मिलाप या विभागात दिसून येतो. या विभागातील ऐतिहासिक वास्तूंसह धार्मिकस्थळे वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. या परिसराची आणखी एक खासियत म्हणजे विभागातील वाहतूक बेट अत्यंत कल्पक आणि सृजनशील कलाकृतींनी नटलेले आहे.
हद्द-पूर्व-पश्चिम:
पूर्व : अरबी समुद्र, रे रोडपर्यंत.
पश्चिम : साने गुरुजी मार्ग, जहांगीर बोमन बेहराम मार्ग, शुक्लाजी स्ट्रीटपर्यंत विस्तारित,
उत्तर : दत्ताराम लाड मार्गापर्यंत विस्तारित
दक्षिण : रामचंद्र भट्ट मार्ग, वाडी बंदर, मौलाना शौकत अली मार्गापर्यंत विस्तारित
वॉर्डाचे वैशिष्ट्य : मुंबईतील भायखळा परिसरातील पारसी काॅलनी हे शहराच्या हेरिटेज वास्तूंमधील वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. भाऊचा धक्का येथील जलवाहतूकदेखील पर्यटकांचे आकर्षण आहे, राजकीयदृष्ट्याही या वाॅर्डचा दबदबा आहे, मात्र सध्याचे राजकारण पाहता आगामी निवडणुकांकडे कोण सत्तेत येणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
मुख्य समस्या : मोठ्या प्रमाणात पुरातन वास्तू असल्याने विकासकामात अडचण. जमिनीची मालकी भिन्न-भिन्न प्राधिकरणाकडे असल्याने विकासकामे करताना सर्व यंत्रणासोबत समन्वय साधावा लागतो.
महापालिका प्रभाग माजी नगरसेवक :
सुरेखा लोखंडे – वॉर्ड क्र. २०७
रमाकांत रहाटे – वॉर्ड क्र. २०८
यशवंत जाधव – वॉर्ड क्र. २०९
सोनम जामसुतकर – वॉर्ड क्र. २१०
रईस कासम शेख - वॉर्ड क्र. २११
गीता अजय गवळी – वॉर्ड क्र. २१२
जावेद जुनेजा – वॉर्ड क्र. २१३
अजयकुमार यादव, सहायक पालिका आयुक्त : ई विभागात लोकंसख्येचे प्रमाण अधिक आहे, शिवाय विभागातील झोपडपट्टीच्या वस्तीचेही आव्हान मोठे आहे. याखेरीस, विभागातील मोठा परिसर हा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अंतर्गत येतो. या विभागातील अरुंद रस्त्यांमुळे येथील पार्किंगची समस्या मोठी आहे. मात्र, अशी स्थिती असूनही नागरिकांच्या समस्यांवर उपाय करण्यासाठी कायम सेवेत असतो.
शैक्षणिक संस्था : सेंट पीटर्स हायस्कूल, सेंटमेरी हायस्कूल, सेंट इझाबेल, सर एली कदुरी हायस्कूल, म्युनिसिपल स्कूल, ग्लोरिया काॅन्व्हेंट हायस्कूल, ख्राईस्ट चर्च स्कूल, अँटोनिया डिसिल्व्हा हायस्कूल, रेजिना पॅसिस काॅन्व्हेंट हायस्कूल, एन्झा स्पेशल स्कूल, मौलाना आझाद हायस्कूल, ह्युम हायस्कूल
पर्यटन स्थळे: वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय, भायखळा
भाऊचा धक्का, कुआन कुंग चायनीझ टेंम्पल,
जोसेफ बाप्टिस्टा गार्डन, माझगाव टेकडी
गावदेवी मंदिर, म्हातारपाखडी
रुग्णालये: कस्तुरबा रुग्णालय, बी. वाय. एल. नायर रुग्णालय, जे. जे. हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, भायखळा, जगजीवनराम हॉस्पिटल, प्रीन्स अली खान हॉस्पिटल, मसिना हॉस्पिटल, केदार हॉस्पिटल, बालाजी हॉस्पिटल.