'कुणी सोबत येवो न येवो, तयारीला लागा', शरद पवारांनी मुंबई मनपा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 02:58 PM2022-07-13T14:58:38+5:302022-07-13T14:59:20+5:30

राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता 'मिशन मुंबई मनपा'साठी कामाला लागले आहेत.

mumbai municipal corporation election 2022 sharad pawar address mumbai leaders says get ready to contest with full majority | 'कुणी सोबत येवो न येवो, तयारीला लागा', शरद पवारांनी मुंबई मनपा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं!

'कुणी सोबत येवो न येवो, तयारीला लागा', शरद पवारांनी मुंबई मनपा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं!

googlenewsNext

मुंबई-

राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता 'मिशन मुंबई मनपा'साठी कामाला लागले आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज मुंबईत राष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी आगामी महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आतापासूनच तयारील लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. तसंच महापालिका निवडणुकीसाठी आपल्यासोबत कुणी येवो न येवो याचा विचार करत बसू नका, तयारीला लागा असे स्पष्ट निर्देश शरद पवार यांनी पदाधिकारी आणि वॉर्ड अध्यक्षांना दिले आहेत. 

मुंबईत आज राष्ट्रवादीच्या वॉर्ड अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी शरद पवार यांनीच आगामी मुंबई महानगरपालिकेसाठीची सर्व धुरा आपल्या हाती घेतल्याचं दिसून येत आहे. कारण आतापासून दर २० दिवसांनी शरद पवार मुंबईतील परिस्थितीचा वॉर्ड अध्यक्षांकडून आढावा घेणार आहेत. तसंच कोणत्या वॉर्डात पक्षाचं प्राबल्य जास्त आहे असे वॉर्ड निश्चित करुन त्याचाही आढावा शरद पवार घेणार आहेत. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची धुरा स्वत: शरद पवार हाती घेणार असल्याचं बोललं जात आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे मुंबई मनपाची सत्ता राखण्याचं आव्हान यावेळी शिवसेनेसमोर असणार आहे. यातच महाविकास आघाडी मुंबई मनपाला एकत्रितरित्या सामोरं जाणार का? याबाबतही अद्याप कोणतीच स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना कुणी सोबत येतंय की नाही याची वाट पाहात बसू नका आणि प्रत्येक वॉर्डात तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

Read in English

Web Title: mumbai municipal corporation election 2022 sharad pawar address mumbai leaders says get ready to contest with full majority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.