मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसचा तिढा उद्या सुटणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 02:56 AM2020-11-01T02:56:16+5:302020-11-01T06:10:26+5:30
Mumbai Municipal Corporation : कोरोना काळात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने दिवसरात्र काम केले. त्यामुळे या वर्षी प्रत्येक कर्मचाऱ्याला २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने केली.
मुंबई : सानुग्रह अनुदानाच्या चर्चेसाठी प्रशासनाकडून तारीख पे तारीख मिळत असल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. अखेर कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार बोनसची रक्कम सोमवारपर्यंत जाहीर करण्यात येईल.
कोरोना काळात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने दिवसरात्र काम केले. त्यामुळे या वर्षी प्रत्येक कर्मचाऱ्याला २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने केली. आतापर्यंत तीन वेळा बोनसबाबत निर्णय घेण्यासाठी आयोजित बैठका रद्द करण्यात आल्या. अखेर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट शुक्रवारी संध्याकाळी घेतली. महापाैर पेडणेकर याही या वेळी हजर हाेत्या. बाेनसबाबत सोमवारी घोषणा केली जाईल, असे महापौरांनी सांगितलेे.