विजयी जल्लोषातही नजर मुंबई पालिकेवर; भाजप आणि आपचा आनंदोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 10:56 AM2022-03-11T10:56:59+5:302022-03-11T10:57:15+5:30

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यालयाबाहेर ढोलताशांच्या गजरात आनंद साजरा केला.

Mumbai Municipal Corporation is also in the spotlight; BJP and your Anandotsav | विजयी जल्लोषातही नजर मुंबई पालिकेवर; भाजप आणि आपचा आनंदोत्सव

विजयी जल्लोषातही नजर मुंबई पालिकेवर; भाजप आणि आपचा आनंदोत्सव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील विजयामुळे भाजप आणि पंजाबच्या घवघवीत यशाने आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. निवडणुकांचे कल स्पष्ट होऊ लागताच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष केला. या जल्लोषा दरम्यान ‘मुंबईतही केजरीवाल’ म्हणत आपने तर ‘मुंबई बाकी है’ म्हणत भाजपने आगामी मुंबई पालिका निवडणुका जिंकण्याची मनिषा जाहीर केली. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यालयाबाहेर ढोलताशांच्या गजरात आनंद साजरा केला. पाटील, आशिष शेलार आदी नेत्यांनी कार्यकर्त्यांसमवेत ढोलताशांच्या तालात ठेकाही धरला. यानंतर बोलताना, आता टार्गेट मुंबई महापालिका आहे. त्या दृष्टीने तयारी करण्याचे आवाहनही पाटील यांनी केले. सर्वांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. ही महानगरपालिका काही करून भाजपच्या ताब्यात आली पाहिजे. शिवसेना नावाच्या पोपटाचा प्राण महापालिकेत अडकला आहे. आता सगळे वाभाडे निघालेत. आठवडाभरतील धाडींनी इथे किती विकास केला आणि घरी किती पैसे नेले, ते उघड केले आहे. त्यामुळे आता महापालिका हेच सर्वांचे टार्गेट असले पाहिजे’, असे पाटील म्हणाले.

आपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दक्षिण मुंबईत जल्लोषात फेरी काढली. निकालानंतर एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला गेला. उत्साही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आझाद मैदान येथील पत्रकार संघातून विजयी मिरवणूकही काढली. 

‘आता मुंबईची बारी’, ‘भ्रष्टाचाराला आप हाच एकमेव पर्याय’, 
‘दिल्ली बदली सारी, अब मुंबईकी बारी’, ‘मुंबईतही केजरीवाल’,  असे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या निकालांमुळे आता शिक्षण आणि आरोग्य सेवेवर निवडणुका लढवल्या जातील. आमच्या प्रतिस्पर्ध्यांनाही या विषयांवर काम करणे भाग पडेल. हे राजकीय परिवर्तन आपने घडविले आहे. मुंबईतही याचे परिणाम दिसतील, अशी भावना आपच्या मुंबईतील नेत्यांनी व्यक्त केली.

Web Title: Mumbai Municipal Corporation is also in the spotlight; BJP and your Anandotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.