मुंबई महानगरपालिका एल’ वॉर्ड; भंगारपासून अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा बाजार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 10:17 AM2023-12-23T10:17:19+5:302023-12-23T10:19:08+5:30
भंगारापासून अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या बाजारापर्यंत सगळे काही याच वॉर्डामध्ये मिळते.
अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा बाजारविमानतळापासून मिठी नदीपर्यंत आणि दरडींपासून जुना आग्रा रोडपर्यंत कायमच गजबज असलेली लोकवस्ती म्हणून ज्या परिसराची ओळख आहे, तो वॉर्ड म्हणजे कुर्ल्यातला ‘एल’ वॉर्ड होय. बरोबर मुंबईच्या मध्यभागी असलेल्या या वॉर्डमध्ये संमिश्र लोकवस्ती असून, भंगारापासून अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या बाजारापर्यंत सगळे काही याच वॉर्डामध्ये मिळते. विमानतळामुळे पंचतारांकित हॉटेल्सपासून अगदी झोपड्यांपर्यंत नजरेस पडणाऱ्या वस्तींमध्ये रात्रंदिवस गजबज असल्याचे चित्र असते.
हद्द-पूर्व-पश्चिम :
पूर्व : अस्लफा व्हिलेपर्यंत
पश्चिम : साकीनाका पोलिस ठाण्यापर्यंत
उत्तर : चांदिवली म्हाडा कॉलनीपर्यंत
दक्षिण : चुनाभट्टी रेल्वेस्थानकापर्यंत
वॉर्डाचे वैशिष्ट्य :
पवई आणि शीतल हे प्रमुख तलाव आहेत. फिनिक्ससारखा मोठा मॉल आहे. बीकेसीसारखे व्यापारी केंद्र लगत आहे. भंगारचा कोट्यवधींचा व्यवसाय होतो. जुना आग्रा रोड हा मुंबईतला प्रमुख रस्ता येथून दिवसाचे २४ तास वाहतो. ज्या नदीने मुंबईला पाण्याखाली नेले होते, ती नदी वॉर्डातून वाहते. मरे आणि हार्बरवरचे महत्त्वाचे स्थानक कुर्ला या वॉर्डात आहे.
मुख्य समस्या :
पवई आणि शीतल हे प्रमुख तलाव आहेत. फिनिक्ससारखा मोठा मॉल आहे. बीकेसीसारखे व्यापारी केंद्र लगत आहे. भंगारचा कोट्यवधींचा व्यवसाय होतो. जुना आग्रा रोड हा मुंबईतला प्रमुख रस्ता येथून दिवसाचे २४ तास वाहतो. ज्या नदीने मुंबईला पाण्याखाली नेले होते, ती नदी वॉर्डातून वाहते. मरे आणि हार्बरवरचे महत्त्वाचे स्थानक कुर्ला या वॉर्डात आहे.
महापालिका प्रभाग माजी नगरसेवक :
अश्विनी माटेकर : वॉर्ड क्र. १५६
आंकाक्षा शेट्ये : वॉर्ड क्र. १५७
चित्रा सांगळे : वॉर्ड क्र. १५८
प्रकाश मोरे : वॉर्ड क्र. १५९
किरणे लांडगे : वॉर्ड क्र. १६०
विजेंद्र शिंदे : वॉर्ड क्र. १६१
वाजिद कुरेशी : वॉर्ड क्र. १६२
दिलीप लांडे : वॉर्ड क्र. १६३
हरीश भांदिर्गे : वॉर्ड क्र. १६४
मोहम्मद आजमी : वॉर्ड क्र. १६५
संजय तुर्डे : वॉर्ड क्र. १६६
सईदा खान : वॉर्ड क्र. १६८
प्रविणा मोरजकर : वॉर्ड क्र. १६९
कप्तान मलिक : वॉर्ड क्र. १७०
सान्वी तांडेल : वॉर्ड क्र. १७१
दिलशादबानू आजमी : वॉर्ड क्र. १७६
धनाजी हेर्लेकर-सहायक पालिका आयुक्त :
लोकसंख्या विलक्षण असून, हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. पायाभूत सेवासुविधा देण्यासह स्वच्छता ठेवण्यावर भर द्यावा लागतो. माजी नगरसेवकांपासून आमदार-खासदारांपर्यंत प्रत्येकाचा वॉर्डात मोठा राबता आहे.
टेक्नॉलॉजी अपडेत होत असतानाच नागरिकही तेवढेच अपडेट होत आहेत. या लोकांना वेळेवर सेवा देणे महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या सहकार्याने परिसर अधिकारी स्वच्छ ठेवण्याचा महापालिकेच्या वतीने सातत्याने प्रयत्न केला जात आहे.
शैक्षणिक संस्था : शिशु विकास मंदिर, कराची हायस्कूल, हॉलीक्रॉस, मायकल, गांधीबाल विद्या मंदिर, शिवाजी विद्यालय, पंत वालावलकर हायस्कूल इत्यादी.
पर्यटन स्थळे : पवई तलाव, फिनिक्स मॉल, विमानतळ परिसर, १६ उद्याने आहेत. खेळाची १४ मैदाने आहेत. रिक्रिएशन ग्राउंड १२ आहेत.
२ डिस्पेन्सरी : भाभा, फौजिया, हबीब, कोहिनूर ही महत्त्वाची रुग्णालये आहेत.